josh hazlewood twitter
Sports

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार गोलंदाज संपूर्ण मालिकेतून बाहेर

Josh Hazlewood: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु असतानाच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडला रुग्णालयात भरती करावं लागलं आहे. दरम्यान त्याच्या खेळण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये सुरु आहे. या सामन्यातील ३ पैकी २ दिवस पावसामुळे धुतले गेले.

तर सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियने फलंदाजांनी ४४५ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला बॅकफूटवर ढकललं. दरम्यान सामन्यातील चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडला रुग्णालयात भरती व्हावं लागलं आहे.

जोश हेजलवूड सामन्यातील चौथ्या दिवशी सुरुवातीच्या १ तासात गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. त्याने १ षटक गोलंदाजी केली. मात्र त्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. जोश हेजलवूडला स्कॅनसाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं आहे. कारण त्याच्या मासंपेशी खेचल्या गेल्या आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, हेजलवूड पुन्हा मैदानात उतरणार नाहीये. यासह तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.

जोश हेजलवूड हा संघातील प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे कर्णधार पॅट कमिन्स त्याला खेळवण्याबाबत कुठलीही रिस्क घेणार नाहीये. हेजलवूड संघाबाहेर होणं हा ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा धक्का आहे.

याबाबतची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पोस्ट शेअर करत दिली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ६ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने विराट कोहलीला बाद करत माघारी धाडलं

भारतीय संघातील टॉप ऑर्डर कोसळला

भारतीय संघातील टॉप ऑर्डरला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. टॉप ऑर्डरमध्ये एकट्या केएल राहुलला सोडलं, तर उर्वरीत कुठल्याही फलंदाजाला फलंदाजीत योगदान देता आलेलं नाही. एकीकडे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज संघाला चांगली सुरुवात करुन देत आहेत. तर भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसत आहेत.

या सामन्यातही यशस्वी जयस्वालने पहिल्या चेंडूवर चौरार मारला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर शुभमन गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो देखील स्वस्तात माघारी परतला. विराटने पहिल्या सामन्यात शतक झळकावलं होतं. त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT