australia yandex
क्रीडा

IND vs AUS: बॉर्डर- गावसकर मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

Matthew Wade Announced Retirement: ऑस्ट्रेलिया संघातील स्टार यष्टीरक्षक फलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

Matthew Wade Retirement News: येत्या काही दिवसांत भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर- गावसकर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान ही मालिका सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघातील स्टार यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला आहे.

मॅथ्यू वेडला ऑस्ट्रेलियासाठी ३ टी-२० वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळाली. दुबईमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेसाठी त्याची ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली होती. या स्पर्धत ऑस्ट्रेलियाने जेतेपदाला गवसणी घातली होती. या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना त्याने १७ चेंडूत ४१ धावांची शानदार खेळी केली होती.

या शानदार खेळीच्या बळावर त्याने ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहचवलं होतं. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला ऑस्ट्रेलियासाठी ३६ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याला जास्त कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र टी-२० संघात त्याने स्थान मिळवलं होतं.

कोचिंग स्टाफमध्ये मिळालं स्थान

मॅथ्यू वेडची ऑस्ट्रेलियाच्या कोचिंग स्टाफमध्ये निवड करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळताना दिसून येणार आहे या मालिकेदरम्यान तो कोचिंग स्टाफमध्ये असणार आहे.

काय म्हणाला मॅथ्यू वेड?

'मला चांगल्याने माहीत होतं की, टी-२० वर्ल्डकपनंतर झाल्यानंत माझी आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपली होती. गेल्या ६ महिन्यांपासून माझी जॉर्ज बेली आणि अँड्रयू मॅकडॉनल्डसोबत निवृत्तीबाबत चर्चा सुरु आहे. गेल्या काही वर्षांपासून मला कोचिंग करायची होती. आता मला चांगली संधी मिळाली आहे. मी बिग बॅश लीग आणि फ्रेचांयझी क्रिकेट खेळणं सुरु ठेवणार आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT