टाेकियाे : आजच्या सामन्यादरम्यान मी थोडे चिंताग्रस्त होते. मी आखलेली रणनिती नीट पार पाडू शकले नाही. पुढच्या वेळी नक्कीच मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करीन. पॅरालिंपकमध्ये paralympics 2020 देशाने टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला याचा मला फार आनंद झाला आहे. मी हे रौप्य पदक माझ्या देशाला समर्पित करते. माझे प्रशिक्षक, कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवार यांच्या सतत पाठिंब्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते असे पॅरालिंपिकपटू भाविना पटेल bhavina patel हिने राैप्यपदक जिंकल्यानंतर आपली भावना व्यक्त केली.
टाेकियाे येथे सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेतील टेबल टेनिस क्रीडा प्रकारात आज भारताच्या भाविना पटेल हिने राैप्यपदक पटकाविले. देशाच्या राष्ट्रीय क्रीडा दिनी भाविनाने मिळविलेल्या पदकामुळे क्रीडाप्रेमींसह नागरिकांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. समाज माध्यमातून भाविनावर काैतुकाचा वर्षावर हाेत आहे.
भाविना पटेल ही गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील सुंधिया या गावातील आहे. शालेय शिक्षणानंतर, आयटीआय संगणक विज्ञान अभ्यासक्रम घेण्यासाठी ती अहमदाबादला गेली. तिथे तिला टेबल टेनिस खेळाची ओढ लागली. तिने संघर्षातून या टप्पा गाठला आहे. भाविनाला टेबल टेनिस व्यतिरिक्त संगीत एेकण्यास खूप आवडते. ती उत्तम स्वयंपाक देखील करते.
तिच्या या यशामुळे तिच्या गावात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या कुटुंबियांनी गरबा खेळू आपल्या लेकीने देशासाठी मिळविलेल्या राैप्यपदकाचा आनंद त्यांच्या गगनात मावेनासा झाला. सर्वांनी गरबा खेळून हा आनंद साजरा केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.