csk  saam tv
Sports

IPL 2023: CSK ची चिंता वाढली! संघातील प्रमुख ऑल राऊंडर होऊ शकतो स्पर्धेतून बाहेर, हेड कोचने दिली मोठी अपडेट

Ben Stokes: संघातील दिग्गज खेळाडूबाबत कोच स्टीफन फ्लेमिंगने मोठी अपडेट दिली आहे.

Ankush Dhavre

Ben Stokes InJury Update: चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये चेपॉकच्या मैदानावर रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार कामगिरी करत ७ गडी राखून विजय मिळवला.

मात्र या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. संघातील दिग्गज खेळाडूबाबत कोच स्टीफन फ्लेमिंगने मोठी अपडेट दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडूंच्या दुखपतीचं सत्र काही थांबताना दिसून येत नाहीये. स्पर्धेची सुरुवात झाल्यापासून खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. इंग्लंडचा कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा या हंगामात केवळ २ सामने खेळणीसाठी मैदानात उतरला आहे. तर उर्वरित सामन्यांमध्ये त्याला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले आहे. दरम्यान आता स्टीफन फ्लेमिंगने स्टोक्स केव्हा पुनरागमन करणार याबाबत वक्तव्य केले आहे.

बेन स्टोक्स केव्हा करणार कमबॅक?

काल झालेल्या रोमांचक सामान्यानंतर कोच स्टीफन फ्लेमिंगने पत्रकार परिषदेत म्हटले की, 'बेन स्टोक्स दुखपतीतून सावरतोय, मात्र तो एक आठवडा मैदानाबाहेर राहणार आहे. स्टोक्स दुखापतग्रस्त झाल्याने आम्हाला धक्का बसला आहे. मात्र त्याची दुखापत गंभीर नाहीये.' (Latest sports updates)

बेन स्टोक्स अजूनही आयपीएल स्पर्धेत स्वतःला सिद्ध करू शकला नाहीये. त्याने या हंगामातील 2 सामन्यांमध्ये केवळ 15 धावा केल्या आहेत. तर केवळ 1 षटक गोलंदाजी केली आहे. काही दिवसांनंतर इंग्लंड आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये एकमात्र कसोटी सामना खेळला जाणार आहे.

हा सामना खेळण्यासाठी तो आयपीएल स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. चेन्नई सुपर किंग्ज संघ जर प्ले ऑफसाठी पात्र ठरला. तर बेन स्टोक्स चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खेळताना दिसून येण्याची शक्यता खूप कमी आहे.

चेन्नई सुपर किंग्ज या संघाने आतापर्यंत या हंगामात जोरदार कामगिरी केली आहे. या संघाने 6 पैकी 4 सामान्यांमध्ये विजय मिळवला आहे. हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की, बेन स्टोक्स या केव्हा पुनरागमन करतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT