Ben Stokes retirement Saam TV
क्रीडा

Ben Stokes : भारताकडून पराभव झाल्यानंतर बेन स्टोक्सचा हादरवणारा निर्णय; वनडेतून निवृत्तीची घोषणा

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने वनडेमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे.

Nandkumar Joshi

मुंबई: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेत इंग्लंडला मायदेशातच पराभवाचा जबरदस्त झटका बसला. त्यानंतर टीम इंग्लंडमध्ये मोठी घडामोड घडली आहे. इंग्लंडचा सुपरस्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यानं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Ben Stokes announces retirement from ODI cricket)

बेन स्टोक्स (Ben Stokes) याने सोशल मीडिया अकाउंटवरून वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मंगळवारी १९ जुलै रोजी दक्षिण आफ्रिका (England vs South Africa) विरुद्ध होणारा वनडे सामना या प्रकारातील त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा असेल, असेही त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मंगळवारपासून ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू होत आहे. त्यातील पहिला सामना हा डरहममध्ये खेळवला जाणार आहे. स्टोक्सचा हा होम ग्राउंड आहे. इथेच होत वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.

अवघ्या ३१ व्या वर्षी बेन स्टोक्स याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्टोक्सनेच या प्रकारात इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन केलं होतं. तीन वर्षांपूर्वी जुलैमध्येच स्टोक्सने लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात ८४ धावांची अविस्मरणीय नाबाद खेळी केली होती. त्या जोरावर तो सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला होता. सुपर ओव्हर देखील बरोबरीत सुटला होता. त्यानंतर अधिक चौकारांमुळे इंग्लंड विजेता ठरला होता. स्टोक्सला या लढतीत प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला होता.

अलीकडेच इंग्लंड टेस्ट संघाचा कर्णधार म्हणून निवड झालेल्या स्टोक्सने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये या निर्णयाची घोषणा केली. स्टोक्स म्हणाला की, मी मंगळवारी डरहममध्ये इंग्लंडकडून वनडेमध्ये अखेरचा सामना खेळणार आहे. मी या प्रकारातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण होता. इंग्लंडकडून खेळताना आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. माझा हा प्रवास खूपच अविस्मरणीय ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT