shubman gill  Saam TV
Sports

Shubman Gill Replacement: BCCI ने शोधलीये शुभमन गिलची रिप्लेसमेंट! बाहेर झाल्यास या दोघांपैकी एकाला मिळू शकते संधी

World Cup 2023: शुभमन गिलबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.

Ankush Dhavre

Shubman Gill Replacement:

भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला धुळ चारत दमदार सुरूवात केली आहे. या सामन्यात शुभमन गिल खेळताना दिसून आला नव्हता. डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्याला रविवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मंगळवारी त्याला डिस्चार्जही मिळाला आहे. मात्र त्याचं वर्ल्डकपच्या आगामी सामन्यांमध्ये खेळणं कठीण दिसून येत आहे. कारण पूर्णपणे फिट होण्यासाठी त्याला कमीत कमी १ ते २ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानूसार, बीसीसीआयची वरिष्ठ निवड समिती एक मिटिंग घेणार आहे. या मिटिंगमध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. ज्यात शुभमन गिलचा मुद्दा अतिशय महत्वाचा असणार आहे.

शुभमन गिल अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यातून तर बाहेर झाला आहे. त्यानंतर पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यातही त्याचं खेळणं कठीण आहे. त्यामुळे निवड समिती ऋतुराज गायकवाड किंवा यशस्वी जयस्वालपैकी एकाचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

गिलऐवजी या खेळाडूंना मिळू शकते संधी..

जर शुभमन गिल लवकरात लवकर पूर्णपणे फिट झाला नाहीतर भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार त्याच्या रिप्लेसमेंटची मागणी करू शकतात. अजित आगरकरांच्या अध्यक्षतेखाली असलेली निवड समिती, ऋतुराज गायकवाड किंवा यशस्वी जयस्वालला १५ सदस्यीय संघात स्थान देऊ शकते. (Latest sports updates)

नुकताच चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात यशस्वी जयस्वालने शतकी खेळी केली होती. तर ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली होती.

या दोघांनी दमदार कामगिरी केली असली तरीदेखील दोघही शुभमन गिल इतकी दमदार कामगिरी करू शकत नाही. शुभमन गिलचं न खेळणं ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरू शकते. त्यामुळे शुभमन गिलची वाट पाहण्याशिवाय भारतीय संघाकडे दुसरा पर्याय शिल्लक नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT