Anshuman Gaekwad News Saamtv
क्रीडा

Anshuman Gaekwad: 'कॅन्सर'ग्रस्त अंशुमन गायकवाड यांना मदतीचा हात! BCCIकडून १ कोटींची मदत; जय शहांनी दिले आदेश

Anshuman Gaekwad News: गेल्या अनेक दिवसांपासून अंशुमन गायकवाड यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू असून त्यांची आर्थिक परिस्थितीही ढासळल्याची माहिती समोर आली होती.

Gangappa Pujari

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड हे कॅन्सरशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून अंशुमन गायकवाड यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू असून त्यांची आर्थिक परिस्थितीही ढासळल्याची माहिती समोर आली होती. माजी क्रिकेटपटू कपिलदेव यांनी याबाबत बीसीसीआयकडे मदतीची मागणी केली होती. कपिलदेव यांच्या मागणीनंतर बीसीसीआयने अंशुमन गायकवाड यांच्या मदतीसाठी धावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ब्लड कॅन्सरशी झुंज देणाऱ्या माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआयने मदतीचा हात दिला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कॅन्सरशी झुंज देत असलेले भारताचे दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना तात्काळ एक कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

तत्पुर्वी जय शाह यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशीही बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि ही मदत घोषित केली. अंशुमन गायकवाड यांच्यावर गेल्या एका वर्षापासून लंडनच्या किंग कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी याबाबतची माहिती देत बीसीसीआयकडे मदत मागितली होती.

तसेच माजी सहकारी मोहिंदर अमरनाथ, सुनील गावसकर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, मदनलाल, रवी शास्त्री आणि कीर्ती आझाद हे गायकवाड यांच्या उपचारासाठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT