T20 World Cup, Jay Shah  Saam TV
Sports

T20 वर्ल्डकपआधीच शहांचा पाकिस्तानला जोरदार झटका!, कोट्यवधींचं होणार नुकसान

जय शहा यांनी आशिया कप २०२३ आधी पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे.

Nandkumar Joshi

T20 World Cup, Jay Shah : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे सचिव जय शहा यांनी आशिया कप २०२३ आधी पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात स्पर्धेसाठी जाणार नाही, असे जय शहा यांनी स्पष्ट केले. मुंबईत बीसीसीआयच्या बैठकीत ते बोलत होते.

आशिया कप २०२३ या स्पर्धेसाठी बीसीसीआय टीम इंडियाला (India Vs Pakistan) पाकिस्तानात पाठवण्यास तयार असल्याचे वृत्त अनेक माध्यमांत आले होते. मात्र, जय शहा यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. भारत जर पाकिस्तानविरुद्ध कोणता सामना खेळणार असेल तर, ते ठिकाण दुसरेच असेल, असे जय शहा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

टी २० वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. २३ ऑक्टोबरला हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होईल. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या या सामन्याआधीच जय शहा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा दणका दिला आहे. जय शहा यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर मोठा पेच पडला आहे. जर टीम इंडिया आशिया कप स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नसेल तर, पीसीबीला अन्य कोणत्या देशआत स्पर्धा भरवावी लागेल. कारण टीम इंडिया खेळली नाही तर, आशिया कप स्पर्धेचे मोठे नुकसान होऊ शकते.

टीम इंडिया १७ वर्षांपासून पाकिस्तानात गेली नाही

भारतीय संघाचा शेवटचा पाकिस्तान दौरा २००५-०६ मध्ये झाला होता. त्या दौऱ्यात टीम इंडियाने पाकिस्तानला ४-१ अशा फरकाने पराभूत केले होते. आता त्याला १७ वर्षे लोटली आहेत. टीम इंडियाने पाकिस्तानात पाय ठेवला नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुरंगी मालिकाही मागील १० वर्षांपासून झाल्या नाहीत. २०१२ मध्ये पाकिस्तानी संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यात दोन्ही संघांमध्ये टी २० आणि वनडे मालिका खेळवण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

SCROLL FOR NEXT