BCCI. google
Sports

BCCI: विराटची टीका; आता कौटुंबिक नियमांबाबत मोठी अपडेट समोर, बीसीसीआयचा टीम इंडियाला धक्का!

BCCI Reply to Virat Kohli: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन धोरणे आखली होती. याअंतर्गत, ४५ दिवसांच्या दौऱ्यात खेळाडूंचे कुटुंबीय जास्तीत जास्त दोन आठवडे त्यांच्यासोबत राहू शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा १-३ असा दारुण पराभव झाल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत प्रवास करण्यासाठी नवीन नियम बनवले होते. काही दिवसांपूर्वी भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने या नियमांवर आपले मत मांडले होते.

कोहली म्हणाला की, जेव्हा एखादा खेळाडू दौऱ्यादरम्यान वाईट काळातून जात असतो, तेव्हा त्या वेळी कुटुंबातील सदस्यांची भूमिका महत्त्वाची असते. यानंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या मुद्द्यावर एक विधान केले आहे. दौऱ्यादरम्यान कुटुंबासह प्रवास करणाऱ्या खेळाडूंसाठी बनवलेल्या नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयचे नवीन धोरण

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन धोरणे तयार केली होती. याअंतर्गत, ४५ दिवसांच्या दौऱ्यात खेळाडूंचे कुटुंबीय जास्तीत जास्त दोन आठवडे त्यांच्यासोबत राहू शकतात. यापेक्षा कमी कालावधीच्या दौऱ्यांवर, खेळाडू त्यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त एक आठवडा सोबत ठेवू शकतात.

बीसीसीआयच्या नवीन नियमांवर कोहलीची प्रतिक्रिया

बीसीसीआयच्या या नियमाबद्दल बोलताना, स्टार फलंदाज विराट कोहलीने आरसीबी कार्यक्रमादरम्यान म्हटले होते की, 'जेव्हा तुम्ही बाहेर असता आणि तुमच्यासोबत काही चांगले होत नसते तेव्हा त्या वेळी कुटुंबासोबत असणे किती महत्त्वाचे असते हे लोकांना समजावून सांगणे खूप कठीण आहे.

मला याबद्दल खूप निराशा वाटते कारण असे दिसते की, खेळाडूंसोबत जे घडत आहे कुटुबांशी जोडले जाते, ज्यांचा काहीही संबंध नाही. आणि अशा लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी आघाडीवर ठेवले जाते. त्यांना या गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे. जर तुम्ही कोणत्याही खेळाडूला विचारले तर, तुम्हाला तुमच्या कुटुंबाला नेहमी तुमच्यासोबत ठेवायचे आहे का? तुम्हाला उत्तर हो असचं मिळेल, कारण मला किंवा कोणालाही खोलीत एकटे बसून दुःखी व्हायचे नाही. मला सामान्यपणे जगायचे आहे. मग तुम्ही तुमचा खेळ खरोखरच जबाबदारी म्हणून घेऊ शकता. तुम्ही ती जबाबदारी पार पाडा'.

धोरणात कोणताही बदल होणार नाही

विराट कोहलीच्या विधानावर बोलताना बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी क्रिकबझला सांगितले की, 'सध्याचे धोरण सध्या तरी कायम राहील. कारण ते देशासाठी आणि संघनेसाठी बीसीसीआयसाठी खूप महत्वाचे आहे. लोकशाही व्यवस्थेत लोकांना त्यांचे विचार व्यक्त करण्याचा अधिकार असल्याने, काही मतभेद किंवा भिन्न मते असू शकतात हे बीसीसीआय मान्य करते. हे धोरण सर्व संघ सदस्यांना - खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, सहाय्यक कर्मचारी आणि सहभागी असलेल्या सर्वांना - समान रीतीने लागू होते आणि सर्वांचे हित लक्षात घेऊन ते अंमलात आणले जात आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

SCROLL FOR NEXT