BCCI guidelines saam tv
Sports

BCCI Rules 2026: IPL मध्ये हनीट्रॅपचा धोका? बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट नियमावली जाहीर

BCCI guidelines: आयपीएल २०२६ दरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेसाठी बीसीसीआयने कडक नियम लागू केले आहेत. हॉटेल पाहुणे, हनी ट्रॅप, वेपिंग आणि ड्रेसिंग रूम प्रवेशावर बंदी घालून शिस्तभंगावर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल २०२६ चा सिझन मध्यावर आला असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना एक नवीन आणि कडक सूचना जारी केलीये . खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेचा विचार करून मंडळाने हॉटेलमधील पाहुणे आणि विझिटर्स यांच्याबाबत कडक नियम लागू केलेत.

फ्रँचायझींना पाठवलेल्या एका अधिकृत पत्रात बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितलं की, या सूचनेचं पालन होतंय की नाही हे आयपीएल ऑपरेशन्स टीम वेळोवेळी तपासणार आहे. सर्व गेस्ट विझिट आणि हॉटेलमधील मुव्हमेंट्सच्या नोंदी ठेवण्याचे निर्देश टीम मॅनेजर्सना देण्यात आलेत.

'हनी ट्रॅप'वर अधिक भर

या नवीन गाईडलाइन्समध्ये प्रामुख्याने 'हनी ट्रॅप' आणि सुरक्षेच्या धोक्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. मंडळाच्या चौकशीत असं उघड झालं की, काही खेळाडू टीम मॅनेजरला माहिती न देता बाहेरील लोकांना त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये बोलवत होते. मात्र आता नियम इतके कडक करण्यात आलेत की, मॅनेजरच्या लेखी परवानगीशिवाय खेळाडूच्या जवळच्या नातेवाईकालासुद्धा खोलीत प्रवेश दिला जाणार नाहीये.

खेळाडूंना पाहुण्यांना फक्त हॉटेलच्या लॉबीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणीच भेटण्याच्या कडक सूचना देण्यात आल्यात. कोणताही संशयास्पद प्रकार किंवा सुरक्षेतील त्रुटी टाळण्यासाठी हॉटेलच्या खोल्या पूर्णपणे प्रायव्हेट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

ड्रेसिंग रूममध्ये वेपिंगही बॅन

अलीकडेच, रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये वेपिंग करताना दिसला गेला. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने स्पष्ट केलंय की, सामना सुरु असलेल्या ठिकाणी, हॉटेल्समध्ये आणि ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट आणि इतर कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांवर कठोरपणे बंदी असेल.

टीमच्या मालकांसाठी नो एंट्री झोन

आणखी एक नियम टीमच्या मालकांशी संबंधित आहे. सामन्यांदरम्यान मालक अनेकदा खेळाडूंना उत्साहाने मिठी मारताना किंवा मैदानावर त्यांच्याशी संवाद साधताना दिसतात. परंतु बीसीसीआयने याला नियमांचं उल्लंघन मानलंय. आता सामन्यांदरम्यान टीमच्या मालकांना ड्रेसिंग रूम, डगआऊट किंवा खेळण्याच्या जागेत खेळाडूंशी शारीरिक संपर्क साधण्यास किंवा थेट संवाद साधण्यास मनाई असणार आहे.

या नियमांचं पालन करण्यासाठी बीसीसीआयने एक टाईमलाईन देखील दिलीये. सर्व संघ मॅनेजर्सने ४८ तासांच्या आत आपल्या खेळाडूंना नियमांची माहिती देणं आणि त्यांनी हे नियम वाचलं व समजून घेतले आहेत, याची लेखी माहिती देणं बंधनकारक आहे. मंडळाने स्पष्टपणे इशारा दिलाय की, कोणताही हलगर्जीपणा आता एक गंभीर शिस्तभंगाची बाब मानली जाणार आहे.

नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंना किंवा कर्मचाऱ्यांना मोठा दंड, कारणे दाखवा नोटीस आणि चालू किंवा पुढील सिझनसाठी निलंबनाची शिक्षा होऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये, बीसीसीआय पोलिसांकडे प्रकरण सोपवण्यासारखी कारवाई करू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT