India vs pakistan match saam tv
Sports

टीम इंडिया करणार पाकिस्तानचा दौरा, 15 वर्षानंतर असं का घडणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

भारत सरकार पाकिस्तानसोबत असलेल्या तणावपूर्ण राजकीय संबंधांबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानमध्ये 2023 मध्ये आशिया कपची रणधुमाळी होणार आहे. या टूर्नामेंटमध्ये एकदिवसीय सामन्यांच्या लढती होणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) त्यांचे विकल्प खुले ठेवले आहेत, अशी माहिती फ्यूचर टूर्स प्रोग्रामने दिली आहे. भारत सरकार पाकिस्तानसोबत असलेल्या तणावपूर्ण राजकीय संबंधांबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. सरकारच्या निर्णयानंतरच बीसीसीआय पुढील वाटचाल करणार आहे. (Team india pakistan tour possibilities after fifteen years)

क्रिकबजने दिलेल्या रिपोर्टनुसार, 18 ऑक्टोबरला बीसीसीआयची वार्षिक बैठक होणार आहे.तत्पूर्वी याबाबत राज्य संघांना एक परिपत्र पाठवलं आहे. यामध्ये पाकिस्तानमध्ये सहभागी होणाऱ्या पुरूष आणि महिला क्रिकेट संघाला आशिया कपबाबत (Asia Cup) सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी तीन वर्ल्डकप टूर्नामेंट आहेत. यामध्ये महिला टी-20 वर्ल्डकप, महिला अंडर-19 वर्ल्डकप आणि आयसीसी पुरुष क्रिकेट वर्डकपचा समावेश आहे.

भारत आशिया कप व्यतिरिक्त या सर्व टूर्नामेंटमध्ये सहभागी होणार आहे. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला नाही. क्रिकबजने बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं म्हटलं,नेहमीप्रमाणेच भारत सरकारच्या परवानगीनंतर हे सर्व होणार आहे.

आगामी काळात भारत आणि पाकिस्तानचा संघ 2023-2027 पर्यंत एकमेकांसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही. बीसीसीआयने सर्व राज्य संघांना माहिती दिली आहे. पाकिस्तानसोबत कोणत्याही द्विपक्षीय मालिकेबाबात फक्त भारत सरकारच्या परवानगीनंतरच निर्णय घेतला जाईल. भारतीय पुरुष क्रिकेट संघ 2023-2027दरम्यान 38 टेस्ट मॅच खेळणार आहे.

ज्यामध्ये 20 घरेलू मैदानावर आणि 18 सामने विदेशी मैदानावर होणार आहेत. भारत 21 घेरलू मैदानावर आणि तेवढेच एकदिवसीय सामने विदेशात खेळणार आहेत.भारताला याचदरम्यान 31 टी-20 घरेलू मैदानावर तर 30 बाहेर खेळायच्या आहेत.म्हणजेच एकूण 61 टी-20 सामने होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

SCROLL FOR NEXT