BCCI On Team India, Ajit Agarkar /Twitter SAAM TV
Sports

Team India : टीम इंडियाचा नवा निवड समिती प्रमुख कोण? ३०० विकेट घेणारा दिग्गज खेळाडू शर्यतीत

निवड समिती बरखास्त केल्यानंतर पुढचा निवड समिती प्रमुख कोण, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Nandkumar Joshi

BCCI On Team India : बीसीसीआयने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा वरिष्ठ निवड समिती बरखास्त करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर बीसीसीआयने केलेली ही पहिली मोठी कारवाई आहे. चेतन शर्मांच्या नेतृत्वाखाली निवड समितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. आता संपूर्ण निवड समिती बरखास्त केल्यानंतर पुढचा निवड समिती प्रमुख कोण, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

रिपोर्ट्सनुसार, भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अजित आगरकर नवीन निवड समिती प्रमुखपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. अजित आगरकरने याआधीही या पदासाठी अर्ज केला होता. मात्र, मागच्या वेळी ही संधी हुकली होती. यावेळी मात्र, आगरकरच्या निवडीची शक्यता अधिक आहे, असे बोलले जात आहे.  (Sports News)

एका रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, अजित आगरकर यांच्याशी अजूनही याबाबत काही बोलणे झालेले नाही. जर ते या पदासाठी अर्ज करू इच्छित असतील तर काही हरकत नाही. मागच्या वेळी ते या पदापासून दूर राहिले होते. ते तरूण आहेत. तिन्ही प्रकारांत खेळण्याचा त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यात आयपीएलचाही समावेश आहे. (Cricket News)

आगरकर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा असिस्टंट कोच

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे असिस्टंट कोच म्हणून अजित आगरकर हे काम करत आहेत. जर त्यांनी निवड समिती प्रमुखपदासाठी अर्ज केल्यास त्यांना हे पद सोडावे लागेल. बीसीसीआयचे नियम बघितले तर अजित आगरकर या पदासाठी योग्य उमेदवार आहेत.

निवड समिती प्रमुखपदासाठी पात्रता

खेळाडूनं सात किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळलेले असावेत.

३० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत.

१० एकदिवसीय आणि २० लिस्ट ए सामने

५ वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती

बीसीसीआयच्या कोणत्याही समितीचा सदस्य नसावा आणि पुढील पाच वर्षांसाठी सेवा देता येईल.

अजित आगरकरची क्रिकेट कारकीर्द

२६ कसोटी, ५८ विकेट

१९१ वनडे, २८८ विकेट

४ टी २० सामने, ३ विकेट

३२ आयपीएल सामने, २९ विकेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस झालं ना दादा... अजित पवारांसामोरच धनंजय मुंडे संतापले | VIDEO

Maharashtra Live News Update: बीडमधून बीड - आहिल्यानगर रेल्वे धावली, मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

Husband Wife Clash : नवरा गाढ झोपेत, बायको दबक्या पावलाने आली अन् अंगावर ओतलं उकळतं पाणी; धक्कादायक कारण समोर

Meenatai Thackeray Statue: हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे संतापले

Dharashiv : मुसळधार पावसाने नद्यांना महापूर; चांदणी नदीच्या पुरात तरुण वाहिला, पोलिसांना वाचविण्यात यश

SCROLL FOR NEXT