harmanpreet kaur twitter
क्रीडा

Team India: BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..Harmanpreet Kaur चे कर्णधारपद जाणार

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाला या स्पर्धेतील साखळी फेरीतून बाहेर पडावा लागला आहे. त्यामुळे संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर जोरदार टिका केली जात आहे.

भारतीय संघाच्या फ्लॉप शो मुळे हरमनप्रीत कौरचं कर्णधारपद धोक्यात आलं आहे. महिला संघाचे हेड कोच अमोल मदूमदार, निवड समितीचे सदस्य आणित बीसीसीआय यांच्यात आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. मात्र २०२० नंतर भारतीय संघाला फायनलमध्ये प्रवेश करता आलेला नाही. भारतीय संघाची कामगिरी सातत्याने ढासळत चालली आहे.

यासह खराब क्षेत्ररक्षण आणि फलंदाजाची कामगिरीही खालावली आहे. याचा फटका आता हरमनप्रीत कौरला बसू शकतो. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यानंतर भारतीय संघाने दमदार कमबॅक करत पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत केलं. मात्र महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं.

हरमनप्रीतचं कर्णधारपद जाणार?

द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या बैठकीत हरमनप्रीतच्या भविष्याबाबत चर्चा केली जाऊ शकते. टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ २४ ऑक्टोबरपासून वनडे मालिका खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. हरमनप्रीतला खेळाडू म्हणून संघात स्थान मिळेल. मात्र ती कर्णधार म्हणून खेळणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

भारतीय संघाच्या पराभवानंतर काय म्हणाली माजी कर्णधार मिताली राज?

भारतीय संघाच्या पराभवाबाबत बोलताना, माजी कर्णधार मिताली राज म्हणाली, ' भारतीय संघातील खेळाडूंना परिस्थितीशी जुळवून घेता आलं नाही. यासह खराब फलंदाज आणि खराब फिल्डींग हे देखील पराभवाचं कारण आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT