दिवसेंदिवस भारतीय क्रिकेटमध्ये प्रगती होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी इतकी स्पर्धा कधीच पाहायला मिळाली नव्हती. काही वर्षांपूर्वी भारतीय संघात स्थान मिळवणं ही खूप मोठी गोष्ट असायची. मात्र आता स्थान मिळाल्यानंतर ते स्थान टिकवून ठेवणं ही त्याहून मोठी गोष्य आहे.
एक फ्लॉप खेळी आणि संघातील स्थान गेलंच समजा. त्यानंतर कमबॅक करण्यासाठी काही मार्गच नसतो. गेल्या काही महिन्यांची आकडेवारी पाहिली, तर भारतीय संघातील युवा खेळाडूंनी अनुभवी खेळाडूंना संघाबाहेर केलंय.
भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल रोहित शर्मासोबत मिळून कसोटीत डावाची सुरुवात करतोय. यशस्वीच्या पदार्पणापूर्वी शुभमन गिल रोहितसोबत डावाची सुरुवात करायचा. ही जोडी सध्या भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. मात्र या खेळाडूंची जागा घेण्यासाठी बरेचशे खेळाडू आपल्या संधीची वाट पाहत आहेत.
साई सुदर्शन, ऋतुराज गायकवाड आणि अभिमन्यू ईश्वरन हे टॉप ऑर्डरसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. तर मुंबईचा युवा फलंदाज, मुशीर खानने देखील स्वत:ला सिद्ध केलं आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत शानदार कामगिरी केल्यानंतर त्याने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात १८१ धावांची खेळी केली होती.
यशस्वी जयस्वाल - २५ सामने, १९१२ धावा
साई सुदर्शन- २१ सामने, १३१२ धावा
ऋतुराज गायकवाड - ३० सामने, २०९२ धावा
मुशीर खान - ७ सामने ७१० धावा
भारतीय संघात कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतो. तर सातव्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज फलंदाजी करतो. त्यामुळे मधल्या फळीत केवळ २ जागा शिल्लक राहतात. काही महिन्यांपूर्वी श्रेयस अय्यर या क्रमांकावर खेळायचा. मात्र त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर पडावं लागलं होतं.
त्यानंतर सूर्यकुमार यादवला या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. मात्र टी-२० क्रिकेटमध्ये हिट असलेल्या सूर्यकुमार यादवला कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडता आलेली नाही. त्यानंतर रजत पाटीदारलाही आपल्या संधीचं सोनं करता आलेली नाही.
श्रेयस अय्यरचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला, तर त्याने ७३ सामन्यांमध्ये ५७२७ धावा केल्या आहेत. तर सूर्यकुमार यादवच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ८२ सामन्यांमध्ये ५६२८ धावा केल्या आहेत.
दरम्यान इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत सरफराज खानला संधी दिली गेली होती. त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आहे. मधल्या फळीत खेळण्यासाठी देवदत्त पडीक्कल, तिलक वर्मा आणि रिंकू सिंग हे फलंदाज रांगेत आहेत.
एमएस धोनीनंतर भारतीय संघाला कसोटीत हवा तसा यष्टीरक्षक फलंदाज मिळाला नाही,जो शेवटी येऊन चांगली फलंदाजी करेल. रिषभ पंतने ही जागा भरुन काढली आहे. मात्र रिषभ पंतच्या अनुपस्थितीत भारतीय संघात यष्टीरक्षकाची कमी जाणवली. केएस भरत, वृद्धिमान साहा यांना संधी मिळाली. मात्र हे फलंदाज या संधीचं सोनं करु शकले नाही. तर ध्रुव जुरेल हा सध्या रिषभ पंतचा बॅकअप ऑप्शन आहे.
भारतीय संघात आर अश्विन, रविंद्र जडेजासारखे अनुभवी गोलंदाज आहेत. या खेळाडूंची जागा भरुन काढणारा गोलंदाज अजूनतरी तयार झालेला नाही. मात्र हृतिक शोकीन हा असा फिरकी गोलंदाज आहे, जो पुढे जाऊन भारतीय कसोटी संघात आपलं स्थान निर्माण करु शकतो. तर वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंगने स्वत:ला सिद्ध केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.