ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बटाटा पासून अनेक नवनवीन डिशेस झटपट आणि बजेट फ्रेंडली डिशेस बनवता येतात. तर जाणून घ्या ब्रेकफास्ट करिता ५ भन्नाट बटाटा डिशेस.
बटाटा चिज कटलेट हा एक परफेक्ट टि-स्कॅक्स आहे. बटाट्याचा मॅश, ब्रेडक्रम्ब्स, मिरची आणि चिज मिक्स करुन कटलेटचे गोळे तयार करा. हे तयार केलेले गोळे तव्यावर सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करा.
नाश्त्यासाठीचा झटपट पर्याय. पोह्यांमध्ये उकडलेला बटाटा बारिक करुन टाका. कढईत राई, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकून मिक्स करा.
बटाटे मंद आचेवर शिवजून घ्या. शिजल्यानंतर बटाटे कट मारुन त्यावर मसाला, लाल तिखट, मीठ, ओवा, हिंग, हळद लावून तव्यावर तळा.
पराठ्यासारखी पातळ पोळी लाटून घ्या. त्यात स्पायसी बटाटा मॅश, कांदा, चटणी, आणि मेयो घालून रोल करा.
घरच्या घरी बटाट्यावर मसाले टाकून आलू टिक्की बनवा आणि ती तव्यावर तळून घ्या. त्यावर दही, हिरवी चटणी, खट्टी-गोड चटणी आणि शेव टाका.
उकडताना पाण्यात थोडं मीठ आणि एक चमचा तेल घातलं की बटाटा लवकर शिजतो आणि फुटत नाही.