team india twitter
Sports

IPL 2025 च्या धामधुमीत तिरंगी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड, कुणाला मिळाली संधी?

IPL 2025 च्या दरम्यान बीसीसीआयने तिरंगी महिला मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व असणार असून, मालिकेला २७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

Namdeo Kumbhar

India women's cricket fixtures : भारतामध्ये सध्या आयपीएलाचा धुमाकूळ सुरू आहे. आयपीएल आता ऐन रंगात सुरू झालेय. यादरम्यान बीसीसीयाने तिरंगी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केली आहे. भारतीय महिला संघ तिरंगी वनडे मालिका खेळणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यामध्ये तिरंगी मालिका होणार आहे. हरमनप्रीत संघाची धुरा सांभाळणार आहे, तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल.

रेणुका सिंह आणि तितास साधु दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांची या मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलकां यांच्यामध्ये २७ एप्रिलपासून तिरंगी मालिका पार पडणार आहे. प्रत्येक संघ चार चार सामने खेळणार आहे. म्हणजे, प्रत्येक संघाविरोधात दोन दोन सामने होणार आहेत.

भारतीय संघ पहिला सामना २७ एप्रिल आणि ४ मे रोजी श्रीलंकाविरोधात खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान २९ एप्रिल आणि ७ मे रोजी सामना होणार आहे. भारतीय संघ कोलंबोमध्ये आपले सर्व सामने खेळणार आहे. आघाडीच्या दोन संघामध्ये ११ मे रोजी फायनल सामना होणार आहे.

Team India Squad: भारतीय संघात कोण कोण ?

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, काशवी गौतम, स्नेह राणा, अरुंधति रेड्डी, तेजल हसबनीस, श्री चरनी, शुची उपाध्याय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! या बँकेचे लायसन्स केले रद्द; तुमचं खाते नाही ना?

Guruwar che Upay: गुरुवारच्या दिवशी करा 'हे' ५ उपाय; घरात येईल धन-समृद्धी

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती

Mumbai : मुंबईकरांनो सावधान ! 26 जुलैला समुद्रात उसळणार मोठ्या लाटा | VIDEO

आपटून आपटून कुणाला मारणार? महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी दुबेंना विचारला जाब, संसदेत राडा

SCROLL FOR NEXT