BCCI New President saam tv
Sports

BCCI New President: BCCI ला मिळाला नवा बॉस! 'या' माजी क्रिकेटरवर सोपवली अध्यक्षपदाची धुरा

BCCI New President: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक ऐतिहासिक निर्णय घेत, देशांतर्गत क्रिकेटमधील एक अनुभवी चेहरा आणि माजी प्रथम-श्रेणी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची बोर्डाच्या अध्यक्षपदी (BCCI President) निवड केली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) नवा अध्यक्ष मिळाला आहे. दिल्लीचे माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. रोजर बिन्नी यांच्या कार्यकाळानंतर आता भारतीय क्रिकेट प्रशासनाची धुरा मन्हास यांच्या हाती आली आहे. विशेष म्हणजे, ते बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळवणारे पहिले अनकॅप्ड (ज्यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाहीत) खेळाडू ठरले आहेत.

दिल्लीचा अनुभवी खेळाडू

मिथुन मन्हास यांनी भारतीय घरगुती क्रिकेटमध्ये दिल्ली टीमचं नेतृत्व करताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी तीनही फॉरमॅट्स (फर्स्ट क्लास, लिस्ट-A आणि टी20) मिळून एकूण 15,010 रन्स केल्या आहेत. 2007-08 सिझनमध्ये त्यांनी दिल्लीला रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्या हंगामात त्यांनी 57.56 च्या सरासरीने 921 रन्स केले होते. मन्हास यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं नाही.

सचिन-द्रविड यांच्या काळातील दमदार घरगुती क्रिकेटपटू

मिथुन मन्हास यांनी 1997-98 साली घरगुती क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो असा काळ होता, ज्यावेळी भारतीय टीममध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांसारख्या दिग्गजांचा दबदबा होता. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीने दीर्घ काळानंतर रणजी विजेतेपद पटकावलं.

फलंदाजीबरोबरच गोलंदाजी आणि विकेटकीपिंगचाही अनुभव

मिथुन मन्हास हे केवळ फलंदाज नव्हते तर ते उजव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजी करत आणि काही प्रसंगी विकेटकीपिंगची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 9714 धावा, लिस्ट-A मध्ये 4126 रन्स आणि टी20 मध्ये 1170 रन्स केले आहेत. घरगुती क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण 32 शतके झळकावली आहेत आणि 70 विकेट्स घेतल्या आहेत.

मिथुन मन्हास यांना केवळ खेळाडू म्हणून नव्हे, तर प्रशासक म्हणूनही अनुभव आहे. त्यांनी जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) मध्ये प्रशासनिक भूमिका बजावली आहे. हा अनुभव आता बीसीसीआयचे नेतृत्व करताना उपयोगी ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : एक चूक अन् टीम इंडियाचा पराभव निश्चित! IND vs Pak मध्ये भारताला 'ही' गोष्ट करावी लागेल फॉलो

Thane Rain : जिल्ह्यात पावसाची संततधार, ठाणे–कल्याण महामार्ग ठप्प, रायतेपूल पाण्याखाली

Monday Horoscope: सोमवार 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! महादेवांचा भक्कम पाठिंबा, नशीबाची साथ; वाचा राशीभविष्य

SSKTK: बिग बॉसच्या सेटवर सनी संस्कारी की तुलसी कुमारीच्या कलाकारांची धमाल, पाहा फोटो

Wheather Alert: आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्टवर

SCROLL FOR NEXT