पुढच्या वर्षी क्रिकेट चाहत्यांना इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2022) स्वरूप बदललेला दिसेल. कारण म्हणजे बीसीसीआय (BCCI) पुढील वर्षापासून दोन नवीन संघांची जोडणी करण्याचा विचार करीत आहे आणि त्यामुळे बीसीसीआयची वार्षिक कमाई खूपच वाढणार आहे. एका वेबसाइटच्या अहवालानुसार सध्या राजस्थान रॉयल्सचे (RR) बाजार मूल्य 1,855 कोटी रुपये आहे. तर चेन्नई सुपर किंग्जची (CSK) किंमत 2,200 ते 2,300 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) संघाची किंमत 2,700 ते 2,800 कोटी रुपये आहे.
राहिला प्रश्न नवीन फ्रेंचायझीचा तर त्यांची आधारभूत किंमत 1,850 कोटी असेल, तर लिलावा नंतर किंमत 2200 ते 2900 कोटीपर्यंत जाऊ शकते. डी अँड पी कंपनीचे संचालक एन. संतोष यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही राजस्थानविषयी बोलत आहोत जो संघ चांगल्या रँकिंग वाला संघ नाहीये. जर त्याची किंमत 250 दशलक्ष डॉलर असेल तर बीसीसीआयसाठी चांगली बातमी आहे. आणि अशा परिस्थितीत भारतीय बोर्ड दोन नवीन संघांची भर घालून 5800 कोटी रुपये कमवू शकेल.
एका अहवालानुसार या दोन नवीन संघांसाठी बोली या महिन्यात लावली जाऊ शकते. अहमदाबाद हा संघ मिळविण्यासाठी मोठे दावेदार असून अनेक जण त्याच्या बाजूने जात असल्याचे दिसत आहे. मोदी स्टेडियमने बर्याच सामन्यांचे आयोजन केले आहे आणि गुजरात लायन्सने यापूर्वीच आयपीएलमध्ये खेळलेला आहे. अहमदाबाद व्यतिरिक्त लखनऊचा संघ आहे जो आयपीएलमध्ये सामील केला जाऊ शकतो. कारण या शहरात चांगले मैदान आणि खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा देखील आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.