bcci considers hike in cricketers test match fees domestic cricket ipl 2024 cricket news marathi  twitter
Sports

Team India News: देशासाठी कसोटी क्रिकेट खेळणारे खेळाडू होणार मालामाल! BCCI मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत

BCCI: भारतीय संघातील काही क्रिकेटपटू कसोटी क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळायचं सोडून आयपीएल स्पर्धेचा सराव करताना दिसून आले आहेत

Ankush Dhavre

Indian Cricketers Match Fees:

भारतीय संघातील काही क्रिकेटपटू कसोटी क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळायचं सोडून आयपीएल स्पर्धेचा सराव करताना दिसून आले आहेत. काही क्रिकेटपंटूवर असे आरोपही करण्यात आले आहेत की, क्रिकेटपटू पैसा कमावण्यासाठी लीग स्पर्धा खेळण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करतात. दरम्यान आता कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआय मोठी घोषणा करु शकते.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या वृत्तानूसार, बीसीसीआय कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या वेतनान वाढ करण्याच्या विचारात आहे. वेतनात वाढ करण्यासह खेळाडूंना बोनसही दिला जाऊ शकतो. आयपीएल स्पर्धा तोंडावर आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी पूर्णपणे फिट राहावं म्हणून खेळाडू रणजी ट्रॉफी स्पर्धेला पाठ फिरवत आहेत.

भारतीय संघातून बाहेर असलेल्या इशान किशनला रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्याने बीसीसीआयचा आदेश धुडकावून लावला. त्यानंतर तो क्रुणाल पंड्यासह आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी सराव करताना दिसून आला होता. श्रेयस अय्यरने देखील दुखापतीचं नाटक करत स्वत: ला रणजी ट्रॉफी स्पर्धेपासून दूर केलं. (Cricket news marathi)

खेळाडूंच्या वेतनात होणार वाढ..

भारतीय संघातील खेळाडूंना एक कसोटी सामना खेळण्यासाठी १५ लाख रुपये मिळतात. तर वनडे सामना खेळण्यासाठी ६ लाख रुपये मिळतात. यासह टी-२० सामना खेळण्यासाठी खेळाडूंना बीसीसीआयकडून ३ लाख रुपये दिले जातात. जे खेळाडू सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत त्या खेळाडूंना ठरलेल्या रकमेप्रमाणे वेतन दिले जाते.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानूसार, आयपीएल २०२४ स्पर्धेनंतर खेळाडूंच्या वेतनात वाढ होऊ शकते. सध्या इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT