jay shah twitter
Sports

ICC President: जय शहा होणार ICC चे नवे अध्यक्ष? ग्रेग बार्कले यांनी घेतला मोठा निर्णय

Jay Shah set to become the next ICC Chairperson: बीसीसीआय सचिव जय शहा आयसीसीचे नवे अध्यक्ष होणार, अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डपैकी एक आहे. जय शहा हे या बोर्डचे सचिव आहेत. दरम्यान लवकरच ते आयसीसीचे अध्यक्ष बनू शकतात, अशी चर्चा सुरु आहे.

सध्या ग्रेग बार्कले हे आयसीसीचे अध्यक्ष आहेत. दरम्यान त्यांचा कार्यकाळ समाप्त होणार असून, ते पुन्हा एकदा या पदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं जात आहे. असं झाल्यास जय शहा हे बीसीसीआयचे सर्वात तरुण अध्यक्ष बनू शकतात.

जय शहा हे गेल्या काही वर्षांपासून बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहे.ग्रेग बार्कले यांनी पुन्हा या पदासाठी निवडणूक लढवली नाही, तर जय शहा हे पद स्वीकारण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं जात आहे.

असं झाल्यास जय शहा हे आयसीसीचं अध्यक्षपद भुषवणारे पाचवे भारतीय ठरतील.यापूर्वी जगमोहन डालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भुषवले आहे.

आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, 'आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी आयसीसीला आधीच सांगितलं आहे की, ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार नाहीत. त्यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर ते राजीनामा देणार आहेत. त्यांचा कार्यकाळ हा येत्या नोव्हेंबरमध्ये समाप्त होणार आहे. ग्रेग बार्कले यांनी २०२० मध्ये अध्यक्षांची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांची पुन्हा एकदा अध्यक्ष पदासाठी नेमणूक करण्यात आली होती.

जय शहा यांनी आयसीसीचे अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे ग्रेग बार्कले यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. यासह इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून देखील जय शहा यांना समर्थन मिळत असल्याचं म्हटलं जात आहे. जय शहा यांना खरंच अध्यक्षपद मिळणार का? हे लवकरच कळेल. दरम्यान २७ ऑगस्ट ही नामांकन जाहीर करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इंदापूरात महात्मा फुलेंच्या 199 व्या जयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली

Mumbai Local Train: बदलापूर फास्ट लोकल वेळेवर आली, पण स्टेशनवर न थांबताच पुढे गेली; लोको पायलटच्या कृतीनं प्रवाशी बुचकळ्यात

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-बायको आणि आईसह वहिनीचाही मृत्यू, नेमके काय घडले?

Jana Nayagan Leak: थलापती विजयला आणखी एक मोठा झटका; प्रदर्शनापूर्वीच 'जन नायकन' ऑनलाईन लीक

गर्लफ्रेंडनं नकार दिला, बॉयफ्रेंडच्या डोक्यात हैवान शिरला; HIV चे इंजेक्शन टोचले, मनानं खचलेल्या मुलीनं आयुष्यच संपवलं

SCROLL FOR NEXT