team india saam tv
Sports

Team India Schedule: 5 टेस्ट, 3 वनडे अन् 8 टी -20 साठी टीम इंडिया सज्ज! BCCI ची मोठी घोषणा; इथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

Team India Schedule For 2023-24 Season: बीसीसीआयने भारतीय संघाच्या २०२३-२४ च्या हंगामाच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. 0

Ankush Dhavre

Team India Full Schedule: बीसीसीआयने भारतीय संघाच्या २०२३-२४ च्या हंगामाच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या हंगामात भारतीय संघ कोणत्या मैदानावर कोणत्या संघासोबत खेळणार आहे याची यादी जाहीर करण्यात आली आहे.

या हंगामात भारतीय संघ १६ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. ज्यात ५ कसोटी सामन्यांसह ३ वनडे आणि ८ टी -२० सामन्यांचा समावेश असणार आहे. यासह भारतीय संघ भारत - ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ कोणत्या मैदानावर आमने सामने येणार याची देखील घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय संघ वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ सप्टेंबर रोजी रंगणार आहे.

तर दुसरा वनडे सामना २४ आणि तिसरा वनडे सामना २७ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. हे सामने मोहाली, इंदूर आणि राजकोटच्या मैदानावर खेळवले जातील. तर वर्ल्डकप झाल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणमच्या मैदानावर रंगणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका झाल्यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तान संघाविरद्ध मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारी २०२४ रोजी रंगणार आहे. (Team India Schedule)

ही मालिका झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ जानेवारी रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाईल. (Latest sports updates)

भारतात रंगणार वनडे वर्ल्डकपचा थरार..

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार यावर्षी भारतात रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या संघांमध्ये रंगणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान हा सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT