BCCI  Saam Tv
Sports

IND vs SA: आफ्रिकेविरुद्ध मैदानात 100 टक्के प्रेक्षकांची उपस्थीती; BCCI चा निर्णय

भारतीय संघ ९ जूनपासून आफ्रिकेविरुद्ध पाच टी-20 सामने खेळणार आहेत.

Pravin

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी १०० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. भारतीय संघ ९ जूनपासून आफ्रिकेविरुद्ध पाच टी-20 सामने खेळणार आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भारतीय क्रिकेट बोर्डाने पाचही ठिकाणी चाहत्यांना पूर्ण क्षमतेने उपस्थीत राहण्यास परवानगी दिली आहे. गेल्या दोन वर्षात देशात कोविड-19 च्या परिस्थितीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामने विनाप्रेक्षक खेळवण्यात आले होते.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या चालू हंगामात देखील स्टेडियमवर चाहत्यांची उपस्थिती दिसून आली परंतु उपस्थितांची संख्या मर्यादित होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार्‍या आगामी टी-20 मालिकेमध्ये प्रेक्षकांचा पुन्हा तोच जोश पाहायला मिळणार आहे.

यापूर्वी, बीसीसीआयने कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएल प्लेऑफसाठी पुर्ण क्षमतेने प्रेक्षक उपस्थीत राहू शकतात याची घोषणा केली होती. कोविड-19 च्या प्रोटोकॉलमधून खेळाडूंना सुट मिळाली आहे, कारण देशातील रुग्णांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे बोर्ड आता चाहत्यांना स्टेडियममधून सामन्याचा आनंद घेण्यासाठी दरवाजे खुले करत आहे.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची T20 मालिका पाच वेगवेगळ्या ठिकाणी खेळणार आहे. नवी दिल्लीत मालिकेची सुरुवात झाल्यानंतर, पुढील सामने अनुक्रमे कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बेंगळुरू येथे खेळवले जाणार आहेत. या मालिकेला ९ जूनला सुरुवात होणार आहे तर शेवटचा सामना १९ जूनला होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने अलीकडेच भारताविरुद्ध खेळणार असलेल्या T20 मालिकेसाठी त्यांचा 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT