Viral Cricket Video twitter
क्रीडा

Viral Video: नेदरलँडविरुद्धचा पराभव बांगलादेशी फॅनच्या जिव्हारी! संतापात स्वत:च तोंड चपलेने झोडलं, Video व्हायरल

Ankush Dhavre

Viral Cricket Video:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आणखी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात नेदरलँड आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात नेदरलँडने बांगलादेशवर ८७ धावांनी विजय मिळवला आहे.

या पराभवानंतर बांगलादेशचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दरम्यान या पराभवानंतर बांगलादेशच्या क्रिकेट फॅनचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नेदरलँड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पार पडला. या सामन्यात बांगलादेशला विजयाचं प्रबळ दावेदार मानलं जात होतं. बांगलादेशला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट फॅन्सने मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मात्र बांगलादेश संघातील खेळाडूंना हा सामना जिंकता आला नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्स निराश झाल्याचे पाहायला मिळाले आहे. (Latest sports updates)

या सामन्यानंतर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात सामना पाहण्यासाठी आलेला क्रिकेट फॅन स्वत:च तोंड चपलेने झोडून घेताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, संतप्त क्रिकेट फॅन शाकिब हल हसनबाबत काहीतरी बोलताना दिसून येत आहे. तर त्यानंतर तो स्वत:लाच चपलेने मारून घेताना दिसून येत आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नेदरलँडकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली.

तर वेस्ली बॅरेसीने ४१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर नेदरलँडने २२९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव अवघ्या १४२ धावांवर संपुष्टात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

SCROLL FOR NEXT