Bangladesh Protest affected cricket: Saamtv
Sports

Bangladesh Protest: बांगलादेशात हिंसाचाराचा उद्रेक! आंदोलक आक्रमक, माजी कर्णधाराचे घर पेटवले, भयावह VIDEO समोर

Bangladesh Protest Affected Cricket: आंदोलकांनी क्रिकेटपटूंच्या घरांनाही लक्ष केले असून बांगलादेशमधील माजी क्रिकेटपटू मशरफी मोर्तझा आणि यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास यांच्या घरांवर हल्ला करत त्यांचे आलिशान बंगले पेटवून दिले.

Gangappa Pujari

Viral Video From Bangladesh Riots: पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा आणि देश सोडून पलायन केल्यानंतर बांगलादेशमधील हिंसाचाराने उग्ररुप धारण केले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून ते रस्त्यांवर सर्वत्र आंदोलकांनी ताबा घेतला असून जाळपोळ, तोडफोड सुरूच आहे. बांगलादेशमधील क्रिकेटपटूंनाही या आंदोलनाची झळ बसली असून अनेक आजी- माजी खेळाडूंची घरे जाळण्यात आली आहेत.

बांगलादेशमध्ये हिंसाचार वाढला!

पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशमध्ये अराजकता माजली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आणखी उग्ररुप धारण केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आंदोलकांनी क्रिकेटपटूंच्या घरांनाही लक्ष केले असून बांगलादेशमधील माजी क्रिकेटपटू मशरफी मोर्तझा आणि यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास यांच्या घरांवर हल्ला करत त्यांचे आलिशान बंगले पेटवून दिले.

माजी कर्णधाराचे घर पेटवले

मशरफी मुर्तझा हे बांगलादेशातील नराइल-2 मतदारसंघाचे खासदार आहेत, जे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या जवळचे मानले जातात. मुर्तझा हे वर्षी सलग दुसऱ्यांदा नरेल-२ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. आंदोलकांनी मुर्तझा यांच्या घराला आग लावून दिली तसेच घराची तोडफोड करत लुटमार केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास याच्या घरावर हल्ला करत आग लावल्याचे सांगण्यात येत आहे.

ICC घेणार मोठा निर्णय!

एकीकडे हिंसाचार आणि दंगलीत बांगलादेश होरपळून निघत आहे. बांगलादेशी क्रिकेटपटूंची घरे जळून खाक झाल्याच्या बातम्या येत असतानाच तर दुसरीकडे क्रिकेटवरही त्याचा जोरदार परिणाम होताना दिसत आहे. बांगलादेशमध्ये महिला टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे, त्यासंदर्भात आयसीसी सतत तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जर परिस्थिती चांगली नसेल तर ही स्पर्धा भारत किंवा यूएईमध्ये हलवली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT