Pakistani Cricketer Babar Azam Connection saam tv
Sports

Fact Check: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बाबर आझमचा हात? 'त्या' स्केचनंतर चर्चेला उधाण

Pakistani Cricketer Babar Azam Connection: मंगळवारी काश्मिरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अजूनही संपूर्ण देश हादरलेला आहे. या हल्ल्यामध्ये २८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता पाकिस्तानी क्रिकेटर बाबर आझमचं यामध्ये कनेख्शन असल्याचं म्हटलं जातंय.

Surabhi Jayashree Jagdish

काश्मिरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यानंतर अजूनही देशातील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सेना पहलगाममध्ये सर्च ऑपरेशन करतेय. यावेळी भारतीय सेनेकडून पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचं स्केच जारी करण्यात आलं आहे. सध्या हे स्केच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहेत.

अशातच स्केचमध्ये असलेल्या एका दहशतवाद्याचा चेहरा पाकिस्तानी क्रिकेटर बाबर आझमशी जुळत असल्याचा दावा करण्यात येतोय. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यामुळे पहलगाम हल्ल्याचं कनेक्शन पाकिस्तानी खेळाडू बाबर आझमशीही जोडण्यात येतंय.

का दाव्यामध्ये किती तथ्य?

फॅक्ट चेकिंग वेबसाईट Dawn च्या रिपोर्टनुसार, बुधवारी २३ एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये पहलगामध्ये हल्ला करणारे दहशतवाद्यांचे संशयितांचे स्केच व्हायरल झाले. यामध्ये एका स्केचमधील व्यक्ती बाबर आझमसारखा दिसत असल्याचं म्हटलं जातंय. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोटोमध्ये कोणतंही तथ्य नाहीये.

रिपोर्ट्सनुसार, या व्हायरल फोटोला एडिट करण्यात आलं आहे. या फोटोला एडिट करून त्याला बाबर आझमसारखं तयार करण्यात आलं आहे. भारतीय सेनेकडून देण्यात आलेल्या स्केचमध्ये बाबर आझमसारखं दिसणारं स्केच नाहीये. त्यामुळे हा दावाही खोटा ठरतोय.

फॅक्ट चेकमध्ये असं समोर आलं आहे की, पाकिस्तानी खेळाडू बाबर आझमचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी कोणताही संबंध नाही.

पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला

पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्लानंतर संपूर्ण देशभरातून टीका होतेय. यावेळी भारतीय क्रिकेटच्या खेळाडूंनी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना न्याय मिळण्याची मागणी केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी देखील या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT