babar azam twitter
क्रीडा

Babar Azam Record: बाबर आझमचा मोठा कारनामा!मोडून काढला एमएस धोनीचा महारेकॉर्ड

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत पाकिस्तानने आपला शेवट गोड केला आहे. पराभवाने स्पर्धेची सुरुवात करणाऱ्या पाकिस्तानने शेवटच्या सामन्यात आयर्लंडवर शानदार विजय मिळवला. या सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवत पाकिस्तान संघाने २ गुणांची कमाई केली. मात्र हा विजय पाकिस्तानसाठी व्यर्थ आहे, कारण पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

पाकिस्तान आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यातही पाकिस्तानचा संघ डगमगताना दिसून आला. एकवेळ असं वाटत होतं की, पाकिस्तानचा संघ हा सामना गमावणार. मात्र कर्णधार बाहेर आझम खेळपट्टीवर टिकून राहिला आणि संघासाठी विजय खेचून आणला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडने २० षटक अखेर ९ गडी बाद १०६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने ११.५ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. पाकिस्तानकडून बाबर आझमने ३४ चेंडूंचा सामना करत ३२ धावांची खेळी केली.

या सामन्यादरम्यान बाबर आझमच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. बाबर आझम हा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या १७ डावात त्याने ५२९ धावा चोपल्या आहेत. या रेकॉर्डमध्ये त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे सोडले आहे. धोनीने भारतीय संघाचं नेतृत्व करताना २९ डावात ५२९ धावा केल्या होत्या.

टी२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे कर्णधार

५४९ धावा - बाबर आझम (१७ डावात)

५२९ धावा - एमएस धोनी (२९ डावात)

५२७ धावा - केन विलियम्सन (१९ डावात)

३६० धावा - महेला जयवर्धने(११ डावात)

३५२ धावा - ग्रॅम स्मिथ (१६ डावात)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan: आज जिंकावंच लागेल! पाकिस्तानविरूद्ध 'या' चुका करणं टीम इंडियाला पडणार महागात

Marathi News Live Updates : एसटी बस थांब्यावरून विद्यार्थ्यांचे रस्त्यावर बसून ठीय्या आंदोलन

Viral Video: वाह गुरु! गणित शिकवण्याचा शिक्षकाचा अनोखा फंडा; असा जुगाड तुम्ही कधीच पाहिला नसेल

Nikki Tamboli : निक्कीला फुल्ल सपोर्ट करा, बिग बॉसची ट्रॉफी आपलीच; नंदुरबारकरांनी काढली मिरवणूक

Maharashtra Politics : आमदार रोहित पवारांचा नवा डाव; चुलत्यावर टीका तर पुतण्याबरोबर गुप्तगू

SCROLL FOR NEXT