Ayush badoni out or not out know what happened during lsg vs mi match amd2000 twitter
क्रीडा

Ayush Badoni Runout: आयुष बदोनी खरंच आऊट होता का? वाचा नेमकं काय घडलं

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्य आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पार पडली. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यातही थर्ड अंपायरने दिलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आयुष बदोनीचा रनआऊट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

नेमकं काय घडलं?

तर झाले असे की, लखनऊ सुपर जायंट्स संघाची फलंदाजी सुरु असताना १९ व्या षटकात आयुष बदोनी फलंदाजी करत होता. त्यावेळी आयुष बदोनी आणि निकोलस पुरनने शॉट खेळताच दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. दुसरी धाव घेत असताना इशान किशनने चेंडू पकडला आणि पहिल्यांदा बेल्स उडवण्यात त्याच्याकडून चूक झाली. त्यानंतर दुसऱ्यांदा त्याने बेल्स उडवली. मात्र तेव्हा तो क्रिझमध्ये पोहोचला असल्याचं दिसून आलं.

हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवण्यात आला. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्यावेळी इशान किशनने बेल्स उडवल्या त्यावेळी आयुष बदोनीची बॅट तर क्रिझच्या आतमध्ये होती. मात्र बॅटचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्ष झालेला नव्हता. त्यामुळे अंपायरने त्याला बाद घोषित केलं.

थर्ड अंपायरच्या या निर्णयावर लखनऊ सुपरजायंट्स संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ नाराज असल्याचं दिसून आलं. हा निर्णय समोर आल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लेंगर अंपायरसोबत चर्चा करताना दिसून आले होते. शेवटी अंपायरने दिलेला निर्णय लखनऊ सुपर जायंट्स संघाला मान्य करावा लागला. अंपायरने दिलेल्या या निर्णयावर भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण देखील नाराज असल्याचं दिसून आलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT