Axar Patel x
Sports

Axar Patel : बापू आए, विकेट लाए... अक्षर पटेलच्या फिरकीत कोलकाताचे कर्णधार-उपकर्णधार अडकले

DC VS KKR : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवताना अक्षरने केकेआरच्या कर्णधार आणि उपकर्णधाराला बाद केले.

Yash Shirke

DC VS KKR IPL 2025 : अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना सुरु आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुनील नारायण आणि रहमानुल्लाह गुरबाज हे कोलकाताचे सलामीवीर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले.

सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये रहमानुल्लाह गुरबाज आणि सुनील नारायण यांनी दमदार खेळ केला. तिसऱ्या ओव्हरमध्ये गुरबाजची विकेट पडली. त्याने २१६.६७ च्या स्ट्राईक रेटने १२ चेंडूत २६ धावा केल्या. त्यानंतर सातव्या ओव्हरमध्ये विपराज निगमने सुनील नारायणला २७ धावांवर बाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी फलंदाजी करत होते.

आठव्या ओव्हरमध्ये दिल्लीचा कॅप्टन अक्षर पटेल गोलंदाजी करण्यासाठी आला. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेला एलबीडब्लू आउट केले. रहाणे २६ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर उपकर्णधार व्यंकटेश अय्यर फलंदाजीसाठी आला. लगेच दहाव्या ओव्हरमध्ये अक्षरने व्यंकटेशला कॅचआउट केले. विपराज निगमने अय्यरची कॅच पकडली. दिल्लीच्या कर्णधाराच्या फिरकीत कोलकाताचे कर्णधार-उपकर्णधार अडकले.

कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग ११ -

रहमानुल्लाह गुरबाज, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसल, रोवमॅन पॉवेल, हर्षित राणा, अनुकूल रॉय, वरुण चक्रवर्ती

(इम्पॅक्टचे पर्याय - मनीष पांडे, मयंक मारकंडे, रमनदीपस सिंह, लवनीथ सिसोदिया, वैभव अरोरा)

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, दुश्मंता चमीरा, मुकेश कुमार

(इम्पॅक्टचे पर्याय - समीर रिझवी, आशुतोष शर्मा, जेक फ्रेजर-मॅकगर्क, त्रिपुराना विजय, डोनोवस फरेरा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT