Avani Lekhara, Sports, India saam tv
क्रीडा

Avani Lekhara : अवनी लेखराच्या ट्विटनंतर तिच्यावर हाेताेय शुभेच्छांचा पाऊस

तिच्या या यशाने देशातील क्रीडाप्रेमी आनंदित झाले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : नेमबाज अवनी लेखराने (Avani Lekhara) आज रायफल शुटींगमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळविले आहे. अवनीने महिलांच्या R2 दहा मीटर रायफल नेमबाजीत SH1 आणि R8 महिलांच्या पन्नास मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये हा मान मिळविला. अवनीने (Chateauroux) येथे पार पाडलेल्या पॅरा नेमबाजी विश्वकरंडक (world cup) स्पर्धेत चमकदार कामगिरी केली हाेती. या यशाचे फळ तिला मिळाले आहे. अवनीने स्वत: ट्विट करुन ही आनंदाची बातमी (news) दिली आहे. (Avani Lekhara Latest Marathi News)

अवनी लिहिते आज खूप आनंद झाला आहे. माझ्या कामगिरीने मी खूप प्रेरित झाले आहे. मला "R2 - 10M एअर रायफल महिलांच्या SH1 आणि R8 - 50M रायफल 3 पोझिशन्स महिला इव्हेंटमध्ये प्रथम क्रमांकाचे जागतिक रँकिंग मिळाले आहे.

अवनीने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये १० मीटर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले हाेते. पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी अवनी पहिली भारतीय महिला ठरली होती. अवनीने फ्रान्स येथे झालेल्या ISSF पॅरा नेमबाजी विश्वकरंडक दहा मीटर रायफल SH1 आणि 50m रायफल 3 पोझिशनमध्ये दुहेरी सुवर्णपदके जिंकले होते. तिने एक नाव विश्वविक्रम स्थापित केला.

अवनी लेखारा सन 2024 च्या पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. तिच्या या यशाने देशातील क्रीडाप्रेमी आनंदित झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT