australian open 2024 twitter
Sports

Australian Open 2024: २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी हुकली! नोवाक जोकोविचचा ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये पराभव

Australian Open News In Marathi: ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open ) स्पर्धेत सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

Australian Open 2024:

ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open ) स्पर्धेत सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी नोवाक जोकोविचला २५ वे ग्रँड स्लॅम जिंकण्याची संधी होती. मात्र त्याची ही संधी थोडक्यात हुकली आहे. कारण जानिक सिनरने त्याला सेमीफायनलमध्ये दमदार खेळ करत ६-१,६-२,६-७(६), ६-३ ने पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या सामन्यात नोवाक जोकोविचने तिसऱ्या सेटच्या टायब्रेकरमध्ये पॉइंट वाचवला. मात्र तो जानिक सिनरला टक्कर देऊ शकला नाही. या सामन्यात नोवाक जोकोविचने भरपूर चुका केल्या. याउलट सिनरने शिस्तबद्ध खेळ केला. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा पॉइंट्स स्कोअर केले. (Tennis News In Marathi)

जानिक सिनरची फायनलमध्ये धडक..

या विजयासह जानिक सिनरने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. नोवाक जोकोविचला पराभूत करताच तो म्हणाला की, ' मी खरच चांगली सुरुवात केली. २ सेट झाल्यानंतर मला जाणवलं की, तो अडचणीत आहे. त्यानंतर मी आणखी जोर लावायचा प्रयत्न केला. तिसऱ्या सेटमध्ये माझ्याकडे मॅच पॉइंट होता. पण मी फोरहॅण्डला चूक केली. हे टेनिस आहे. मी लगेच पुढच्या सेटची तयारी केली. मी तिसऱ्या सेटचीही दमदार सुरुवात केली. इथे खेळून खूप आनंद झाला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT