Rafael Nadal Saam Tv
Sports

Australian Open: चूरीशच्या सामन्यात Rafael Nadal जिंकला; उपांत्य फेरीत प्रवेश

या स्पर्धेत आत्तापर्यंत नदालने सातव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

साम न्यूज नेटवर्क

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open 2022) आज झालेल्या चूरशीच्या सामन्यात राफेल नदालने (Rafael Nadal) डेनिस शापोवालोव्हचा (Denis Shapovalov) ४ तास ८ मिनिटांत ६-३, ६-४, ४-६, ३-६, ६-३ असा पराभव करुन स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेत आत्तापर्यंत नदालने (rafael nadal latest marathi news) सातव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विजयानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला हाेता. (rafael nadal defeats denis shapovalov to enter semis in aus open 2022)

राफेल नदालने (rafael nadal) पहिला सेट 39 मिनिटांत 6-3 असा जिंकला. शापोवालोव्हने (Australian Open) वेळोवेळी आपली क्षमता दाखविल्याने स्पॅनिश खेळाडूने पहिल्या सेटवर बहुतांशी नियंत्रण ठेवले होते. डेनिस शापोवालोव्हने दुसऱ्या सेटची सुरुवात चांगली केली पण नदालने सामन्यात पुनरागमन केले हाेते. एका वेळी असे वाटत होते की शापोवालोव्ह सेट जिंकू शकेल परंतु नदालने ती शक्यता फाेल ठरवत हा सेट 6-4 असा जिंकला (victory).

शापोवालोव्हची आघाडी

डेनिस शापोवालोव्हने 51 मिनिटांत तिसरा सेट 6-4 असा जिंकला. या सेटमध्ये डबल फॉल्टमुळे नदालला दुखापत झाली हाेती. त्यानंतर चाैथ्या सेटमध्ये नदालला संघर्ष करावा लागला. सुमारे तासापूर्वी नदाल खेळत हाेत तसा ताे चाैथ्या सेटमध्ये खेळत असल्याचे जाणवले नाही.

अन् नदाल जिंकला

सहाव्या मानांकित राफेल नदालने पहिले दोन सेट जिंकून सामन्यावर पकड मिळवली हाेती. परंतु सामना जिंकण्यासाठी त्यास संघर्ष करावा लागला. अंतिम सेटमध्ये त्याने 3-0 अशी आघाडी घेत सामना जिंकला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT