rohit sharma twitter
Sports

IND vs AUS: आता हद्दच झाली...आधी विराटला जोकर म्हटलं आता रोहितचीही खिल्ली उडवली

India vs Australia 4th Test, Australian Media Targets Rohit Sharma: विराट कोहलीनंतर आता ऑस्ट्रेलियन माध्यमांनी रोहित शर्माला टार्गेट केलं आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघ बॉर्डर- गावसकर मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील पहिल्याच कसोटीत भारतीय संघाने यजमानांना पराभवाची धूळ चारली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन माध्यमांनी भारतीय खेळाडूंना टार्गेट करायला सुरुवात केली आहे.

खेळाडूंवर टीका करणं ठिक होतं. पण आता ऑस्ट्रेलियन माध्यमांनी आपलीच हद्द पार केली आहे. आधी विराट आणि आता रोहितला टार्गेट केलं गेलं आहे.

ऑस्ट्रेलियन माध्यमांकडून भारतीय खेळाडूंचा सातत्याने अपमान केला जातोय. विराट कोहली जेव्हा या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात आगमन झालं होतं, त्यावेळी विराटला किंगचं आगमन असा दर्जा देण्यात आला होता. मात्र मेलबर्न कसोटीतील पहिल्या डावात विराटने सॅम कॉन्टासला धक्का मारला. त्यानंतर, ऑस्ट्रेलियन माध्यमांनी विराटला टार्गेट करायला सुरुवात केली. मुख्य पेजवर त्याचा जोकर म्हणून उल्लेख करण्यात आला.

रोहितवर जोरदार टीका

मेलबर्नच्या मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत भारतीय संघ बॅकफूटवर होता. मात्र आता भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं आहे. आजच्या वेस्ट ऑस्ट्रेलियन या वर्तमानपत्रात रोहितचा रडकं बाळ असा उल्लेख करण्यात आला आहे. यासह जोकर विराट कोहलीप्रमाणेच रोहित देखील भित्रा आहे, असं म्हटलं गेलं आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी आला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना, ऑस्ट्रेलियाने ४७४ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला ३६९ धावांपर्यंत मजल मारता आली.

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ११४ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ९ गडी बाद २२८ धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ३३३ धावांची मोठी आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Palghar News: जीवावर उदार होऊन शिक्षणासाठी दररोज नदी पार करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष कधी थांबणार? VIDEO

Maharashtra Live News Update: आमदार संग्राम जगताप यांना गोळी घालण्याची धमकी; जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश

Hunger Causes : असा कोणता आजार आहे ज्यात प्रचंड भूक लागते?

Jalna Crime : मुलीच्या छेडखानीला विरोध करणाऱ्या पित्याला बेदम मारहाण; जालन्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT