matthew wade  saam tv news
क्रीडा

IND vs AUS: नेमकं चुकलं तरी कुठं? विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या दारुण पराभवानंतर मॅथ्यू वेडने सांगितलं कारण

India vs Australia 5th T20I: वर्ल्डकपविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेत दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे

Ankush Dhavre

Matthew Wade Statement:

वर्ल्डकपविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेत दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या यंग ब्रिगेडने वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाची व्याजासह परतफेड केली आहे.

ही मालिका झाल्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. दरम्यान भारतीय संघाकडून पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने मोठं वक्तव्य केलं आहे.

या मालिकेत पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेड म्हणाला की,' मला वाटतं की,आम्ही अपेक्षेपेक्षा अधिक चांगली गोलंदाजी केली. आम्ही त्यांना कमी धावांवर रोखलं होतं. या मैदानावर हे आव्हान आम्ही निश्चितपणे पूर्ण करु शकलो असतो. शेवटच्या ५ ते ६ षटकात आमच्या फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. टी -२० वर्ल्डकप पाहता मध्यक्रमात टीम डेव्हिड आणि मार्कस स्टोइनिस हे लोव्हर मिडल ऑर्डरमध्ये मजबूती देऊ शकतात. मी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेची वाट पाहतोय.'

तसेच तो पुढे म्हणाला की,'आजचा निकाल जर आम्हाला हवा तसा आला असता तर, मालिका २-३ ने समाप्त झाली असती. आम्ही चांगला खेळ केला. आम्ही पराभूत झालोय मात्र आम्ही खूप काही शिकलोय. या मालिकेत जेसन बेहरनडॉर्फ,ड्वारशूइस आणि संघा सारख्या गोलंदाजांनीही आपली छाप सोडली.' (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने ३१ धावा चोपल्या. दरम्यान २० षटकअखेर भारतीय संघाने ८ गडी बाद १६० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला १५४ धावा करता आल्या. दरम्यान भारतीय संघाने या सामन्यात ६ धावांनी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आघाडीवर

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT