australia vs south africa world cup 2023 australia need 312 runs to win live cricket score  twitter
Sports

AUS vs SA: डीकॉक अन् मार्करमची झुंजार खेळी; आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाला ३१२ धावांचं आव्हान

Australia vs South Africa LIVE Score: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Australia vs South Africa LIVE Score:

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील १० वा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. लखनऊच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने ५० षटकअखेर ७ गडी बाद ३११ धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ३१२ धावांची गरज आहे.

दक्षिण आफ्रिकेने उभारला धावांचा डोंगर ...

या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाकडून सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकने १०६ चेंडूंचा सामना करत १०९ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार मारले.

तर कर्णधार एडेन मार्करमने ४४ चेंडूंचा सामना करत ५६ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारले. दक्षिण आफ्रिकेने या डावात ३११ धावांचा डोंगर उभारला आहे. आता ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हे आव्हान पूर्ण करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT