Border-Gavaskar Trophy saam tv
Sports

Border-Gavaskar Trophy: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी टीमची घोषणा; पर्थ टेस्टमध्ये 'हा' ओपनर करणार डेब्यू

Border-Gavaskar Trophy: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ५ टेस्ट सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना २२ नोव्हेंबर रोजी होणार असून यासाठी पहिल्या सामन्यासाठी टीमची घोषणा केली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

न्यूझीलंडनंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ५ टेस्ट सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना २२ नोव्हेंबर रोजी होणार असून यासाठी पहिल्या सामन्यासाठी टीमची घोषणा केली आहे. यामध्ये २ नव्या खेळाडूंना संधी मिळाली आहे.

ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम जाहीर केला असून सध्या त्यांनी पहिल्या म्हणजेच पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी टीम जाहीर केलीये. 13 सदस्यीय टीममध्ये दोन नवीन चेहऱ्यांना संधी मिळालीये. त्यापैकी एक पर्थच्या खेळपट्टीवर टीम इंडियाविरुद्ध पदार्पण करण्याची शक्यता आहे. हा खेळाडून ओपनिंगमध्ये उस्मान ख्वाजाचा जोडीदार असण्याची शक्यता आहे.

हा फलंदाज म्हणजे 25 वर्षीय नॅथन मॅकस्वीनी. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, या खेळाडूचा पर्थमध्ये टेस्ट डेब्यू निश्चित मानला जातोय. याशिवाय जोश इंग्लिशनेही टेस्टमध्य टीमध्ये सरप्राईज एंट्री करणार आहे.

नॅथनला कशी मिळाली संधी?

25 वर्षीय फलंदाज नॅथन मॅकस्वीनी ओपनिंगच्या शर्यतीत आघाडीवर होता. त्याने भारत अ संघाविरुद्ध इतर दावेदारांपेक्षा चांगली कामगिरी केली होती. शिवाय रिकी पाँटिंग आणि टीम पेन सारख्या दिग्गजांनीही त्याने ओपनिंग करावी असं म्हटलं होतं. नुकत्याच संपलेल्या भारत अ विरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये नॅथनने सर्वाधिक रन्स केले होते.

पर्थ टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाची टीम जाहीर

ऑस्ट्रेलियाच्या टीममधून वेगवान गोलंदाजांमध्ये स्कॉट बोलंडला टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. पॅट कमिन्स या टीमचं नेतृत्व करणार आहे. कशी आहे टीम ऑस्ट्रेलिया पाहूयात-

पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, ॲलेक्स कॅरी, मार्नस लॅबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लियॉन, मिचेल मार्श. नॅथन मॅकस्वीनी, जोश इंग्लिस, जोश हेझलवुड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT