australian cricket team saam tv
Sports

T-20 WC आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना खेळवण्याची आली वेळ

T-20 World Cup 2024, Australia Cricket Team: टी-२-० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने टेन्शन वाढलं आहे.

Ankush Dhavre

नुकताच आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना पार पडला. या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आता ही स्पर्धा झाल्यानंतर सर्व खेळाडू टी-२० वर्ल्डकपच्या तयारीसाठी मायदेशी परतले आहेत. दरम्यान या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी सराव सामन्यांचा थरार रंगणार आहे. हे सामने सुरु होण्यापू्र्वी ऑस्ट्रेलियाच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. कारण पहिला सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे ११ खेळाडूच नाहीये.

ऑस्ट्रेलियाचा पहिला सराव सामना २९ मे रोजी नामिबिया संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे ११ खेळाडू सुद्धा नाहीये. त्यामुळे सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर उतरावं लागणार आहे. त्यांना संघाकडून खेळण्याची संधी मिळेल, मात्र ते फलंदाजी आणि गोलंदाजी करु शकणार नाही. ज्या खेळाडूंचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे, त्या खेळाडूंना देखील सराव सामना खेळता येणार नाही. त्यामुळे सपोर्ट स्टाफला मैदानावर उतरावं लागणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, पहिल्या सामन्यासाठी ८ खेळाडू उपलब्ध असणार आहेत. कारण काही खेळाडू अजूनही त्रिनिदादमध्ये दाखल झालेले नाहीत. तर काही खेळाडू नुकताच आयपीएल २०२४ स्पर्धेचा फायनल सामना खेळताना दिसून आले. पहिल्या सराव सामन्यात या संघाला सपोर्ट स्टाफमधील सदस्य घेऊन खेळावं लागेल. मात्र त्यानंतर होणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात सर्व खेळाडू उपलब्ध असतील.

या स्पर्धेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ

मिचेल मार्श (कर्णधार), एश्टन एगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नाथन एलिस, कॅमरुन ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झाम्पा.

राखीव खेळाडू - जॅक फ्रेजर मॅकगर्क, मॅथ्यू शॉर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारामतीत अवकाळी पावसाला सुरुवात

Actress Khushi Mukherjee: कारला धडकली दुसऱ्याची गाडी; अभिनेत्री फटाके विक्रेत्यावरच संतापली; भररस्त्यात अभिनेत्री मुखर्जीचा राडा

Saam Impact: धुळ्यात दूध भेसळ! साम टीव्हीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग, FDAच्या अधिकाऱ्यांची कारवाईसाठी धावपळ|VIDEO

PM Kisan Update : पीएम किसान योजनेचे २००० रुपये खात्यात कधी जमा होणार? कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीत मिळाली गोड बातमी

Rupali Bhosle Photos: निळ्या पैठणी साडीमध्ये रूपालीचा मराठमोळा साज, फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT