Aus vs NZ World Cup Match:
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडमध्ये हिमाचलमधील धर्मशाला स्टेडियम रोमहर्षक सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर मात केली. ऑस्ट्रेलियाने अवघ्या ५ धावांनी सामना जिंकला आहे. (Latest Marathi News)
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ट्रेविसने हेडने शतकी खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाने ४९.२ षटकात ३८८ धावांचा डोंगर उभा केला. या स्पर्धेतील पहिला सामना खेळताना ट्रेविस हेडने ६७ चेंडूत १०९ धावा कुटल्या. तर न्यझीलंडच्या ग्लेन फिलिपने १० षटकात ३७ धावा देऊन ३ गडी बाद केले. ट्रेट बोल्टने तीन , मिचेलने दोन तर मॅट हेनरी आणि नीशमने प्रत्येकी १-१ गडी बाद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यझीलंडची सुरुवात चांगली झाली. कॉनवे आणि विल यंगने पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागादारी रचली. त्यानंतर कॉनवे २८ तर यंग ३२ धावांवर बाद झाला.
पुढे रचिन रवींद्रने संघाचा डाव सांभाळला. डेरिल मिचेल आणि रचिने तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी रचली. मात्र, पुढे मिचेल ५१ धावांवर बाद झाला. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम देखील २२ चेंडूवर २१ धावा करून बाद झाला.
ग्लेन फिलीपने १६ चेंडूत १२ धावा करत बाद झाला. मात्र,याचदरम्यान, रचिन रवींद्रने शतक ठोकलं. पुढे रचिन ८९ चेंडूवर ११६ धावा करून बाद झाला. मिचेलही स्वस्तात माघारी परतला. न्यूझीलंडच्या संघाला एका षटकात १९ धावा हव्या होत्या.
न्यूझीलंडने पहिल्या चेंडूत एक धाव काढली. त्यानंतर वाइड आणि चौकार अशी अतिरिक्त पाच धावा मिळाल्या.षटकाच्या दुसऱ्या चेंडूत नीशमने दोन धावा काढल्या. तिसऱ्या चेंडूत पुन्हा दोन धावा काढल्या. चौथ्या चेंडूतही दोन धावा काढण्यात यश आलं. मात्र, पाचव्या चेंडूत नीशम बाद झाला. त्यानंतर शेवटच्या चेंडूत सहा धावा हव्या होत्या. त्यावेळी न्यूझीलंडला एकच धाव काढण्यात यश आलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पाच धावांनी मात केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.