Aaron Finch T20 World Cup
Aaron Finch T20 World Cup saam tv
क्रीडा | IPL

शिवीगाळ केल्यामुळे अडकला ऑस्ट्रेलियाला कर्णधार अ‍ॅरॉन फिंच; टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर जाण्याची शक्यता

Vishal Gangurde

Aaron Finch T20 World Cup : टी-२० वर्ल्डकपच्या आधीच ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला शिवीगाळ करणे चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्ध पर्थमधील टी-२० सामन्यात शिवीगाळ केल्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला दंड ठोठाविण्यात आला आहे. फिंच आयसीसी (ICC) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्यामुळे फिंच टी-२० वर्ल्डकपमधून (T-20 World Cup) बाहेर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं ?

इंग्लंडचा डाव सुरू असताना नवव्या षटकात अॅरॉन फिंचने अपशब्द वापरले. त्याचा अपशब्द स्टम्प माइकवर रेकॉर्ड झाला. त्यामुळे अॅरॉन फिंच हा आयसीसी आचारसंहितेनुसार २.३ नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्यानंतर अॅरॉन आरोप मान्य केले. फिंचची वागणूकीची नोंद करत एक पाँइटची नोंद करण्यात आली आहे. याचा अर्थ यापुढे फिंचने पुन्हा शिवीगाळ केल्यास त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात येऊ शकते.

अॅरॉन फिंचने गेल्या दोन वर्षात आयसीसी आचारसंहितेच्या उल्लंघन केले नाही. मात्र, अद्यापही फिंच टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. खेळाडून आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास सदर खेळाडूच्या रेकॉर्डमध्ये चार गुण कापले जातात. तसेच त्या खेळाडूवर बंदी देखील घातली जाऊ शकते. याचदरम्यान, अॅरॉन फिंच इंग्लंड दौऱ्यात पुन्हा आयसीसी नियमांचे उल्लंघन केल्यास सुरू असलेल्या मालिकेतून किंवा टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे.

टी२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रलियाचा संघ -

अॅरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेविड वार्नर, मार्कस स्टोयनिस, एश्टन एगर, पॅट कमिन्स, टिम डेविड, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क आणि एडम जाम्पा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Shekhar Suman joins BJP: अभिनेते शेखर सुमन यांनी केला भाजपा पक्षात प्रवेश

Baramati Lok Sabha: बारामतीकरांना ४ जूनला गोड बातमी मिळेल; आमदार रोहित पवारांना विश्वास

सातारा लाेकसभा मतदारसंघात पैसे वाटप झाल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, Video

Baramati News | EVM वर कमळाचं चिन्हच नाही, बारामतीचे आजोबा संतापले

Live Breaking News : Raigad Breaking : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार

SCROLL FOR NEXT