World Cup-2023 Saam TV
Sports

World Cup 2023 Point Table : ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलचं समीकरण बदललं, पाकिस्तानला मिळणार सेमीफायनलचं तिकीट?

World Cup 2023 Latest news : ऑस्ट्रेलियाचे 7 सामन्यात 10 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचे आणखी 2 सामने बाकी आहेत. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी अटीतटीची लढत आहे.

प्रविण वाकचौरे

World Cup 2023 :

वर्ल्डकपचे साखळी सामने संपत आहेत, तसतशी सेमीफायनलची शर्यत आणखी रंजक होत आहे. भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली आहे. त्याचवेळी तिसरा संघ म्हणून ऑस्ट्रेलियाचा दावा सर्वात मजबूत आहे. ऑस्ट्रेलियाचे 7 सामन्यात 10 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचे आणखी 2 सामने बाकी आहेत. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी अटीतटीची लढत आहे.

पाकिस्तानशिवाय न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे चौथ्या स्थानाचे दावेदार आहेत. सध्या न्यूझीलंड चौथ्या, पाकिस्तान पाचव्या आणि अफगाणिस्तान गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असले तरी या तिन्ही संघांचे समान 8-8 गुण आहेत. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाचे 7 सामन्यांत 10 गुण आहेत, हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट +0.924 आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडचे 8 सामन्यांत 8 गुण आहेत, तर नेट रन रेट धावगती +0.398 आहे.

पाचव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानचे 8 सामन्यांत 8 गुण आहेत, तर नेट रन रेट +0.036 आहे. याशिवाय, सहाव्या क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्तानचे 7 सामन्यांत 8 गुण आहे आणि नेट रन रेट -0.330 आहे. मात्र अफगाणिस्तानने पाकिस्तान आणि न्यूझीलंडपेक्षा 1 सामना कमी खेळला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंग्लंड स्पर्धेतून बाहेर

ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर गतविजेता इंग्लंड संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. बांगलादेशनंतर बाहेर पडणारा इंग्लंड हा दुसरा संघ ठरला. त्याचबरोबर गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेचे 7 सामन्यांत 4 गुण झाले आहेत. तर या संघाचा नेट रन रेट -1.162 आहे. आठव्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँडचे 7 सामन्यांत 4 गुण आहेत, तर नेट रन रेट -1.398 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT