aus vs sa saam tv news
Sports

AUS vs SA, Semi Final: .. तर दक्षिण आफ्रिकेला मिळणार थेट फायनलचं तिकीट; समोर आलं मोठं कारण

AUS vs SA, Weather Update: वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने असणार आहे.

Ankush Dhavre

South Africa vs Australia World Cup Semi Final Latest Update:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनूसार, १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना रद्द केला जाऊ शकतो. (Kolkata Weather Today)

बंगालमध्ये जोरदार पावसाचा अंदाज..

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनूसार, १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी बंगालच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी बरसणार आहेत. इतकच नव्हे तर, १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान मच्छिमारांनाही समुद्रात जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. (AUS vs SA Weather Update)

या सामन्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हा सामना आज पूर्ण होऊ शकणार नाही. आनंदाची बाब म्हणजे या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर हा सामना आज पूर्ण होऊ शकला नाही तर, उद्या (१७ नोव्हेंबर) म्हणजे राखीव दिवशी हा सामना खेळवण्यात येईल. (Latest sports updates)

पावसामुळे सामना रद्द झाल्यास कसा लावला जाईल निकाल?

जर हा सामना पूर्ण होऊ शकला नाही तर राखीव दिवशी सामना खेळवला जाईल. राखीव दिवशी सामना तितूनच सुरु होईल जिथे हा सामना थांबवण्यात आला होता. जर राखीव दिवशीही सामना पूर्ण होऊ शकला नाही तर दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. (Cricket World Cup)

कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. असं झाल्यास अहमदाबादच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप फायनलचा सामना पाहायला मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT