eden garden twitter
Sports

AUS vs SA: दक्षिण आफ्रिका- ऑस्ट्रेलिया सामन्यात पाऊस ठरतोय व्हिलन! सामना रद्द झाल्यास कोणाला होणार फायदा?

Rain In Australia vs South Africa Match: हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर कोणाला फायदा मिळेल?

Ankush Dhavre

SA vs AUS Semi final, World Cup 2023 Latest Update:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरु आहे. हा सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना सुरवातीलाच चुकीचा ठरल्याचं दिसून आलं आहे. पावसामुळे खेळ थांबण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने १४ षटकअखेर ४ गडी बाद ४४ धावा केल्या. त्यानंतर पाऊस पडला आणि सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सामना रद्द झाला तर काय?

जर हा सामना पावसामुळे आज होऊ शकला नाही. तर हा सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. सेमीफायनल आणि फायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवण्यात येईल. जर राखीव दिवशीही हा सामना पूर्ण होऊ शकला नाहीतर पुढे काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच.

राखीव दिवशीही हा सामना पूर्ण होऊ शकला नाही तर गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल. असं झाल्यास टेम्बा बावूमाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला फायदा होणार आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

दक्षिण आफ्रिका:

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जान्सेन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.

ऑस्ट्रेलिया :

ट्रेविस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिंस (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेजलवूड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT