mitchell starc twitter
Sports

AUS vs PAK: मिचेल स्टार्कने मोडला ब्रेट लीचा रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

Australia vs Pakistan, Mitchell Starc Record: ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मोठ्या रेकॉर्डमध्ये ब्रेट लीला मागे सोडलं आहे.

Ankush Dhavre

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियमध्ये पार पडला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघातील वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

त्याने ऑस्ट्रेलियात खेळताना सर्वात वेगवान १०० गडी बाद करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहेय यापूर्वी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदजा ब्रेट लीच्या नावावर होता. मात्र आता हा रेकॉर्ड मोडला गेला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात गोलंदाजी करताना, स्टार्कने १० षटकात ३३ धावा खर्च केल्या आणि पाकिस्तानच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. या डावात गोलंदाजी करताना त्याने सईम अयुब, अब्दुल्ला शफीक आणि शाहीन आफ्रीदी यांना बाद केलं.

स्टार्क हा ऑस्ट्रेलियात गोलंदाजी करताना १०० गडी बाद करणारा ६ वा गोलंदाज ठरला आहे. याआधी ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, शेन वॉर्न, स्टीव्ह वॉ, क्रेग मॅकडरमोट यांनी १०० गडी बाद केले आहेत. मात्र स्टार्क आता सर्वात वेगवान १०० गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे.

ऑस्ट्रेलियात सर्वात वेगवान १०० गडी बाद करणारे गोलंदाज

मिचेल स्टार्क- ५४

ब्रेट ली - ५५

ग्लेन मॅकग्रा - ५६

शेन वॉर्न - ६१

क्रेग मॅकडरमोट- ७१

स्टीव्ह वॉ -९३

मिचेल स्टार्कने मायदेशात खेळताना, सर्वात जलद १०० गडी बाद करण्याच्या बाबतीत स्टीव्ह वॉला मागे सोडलं आङे. वॉ ने मायदेशात खेळताना, १०१ गडी बाद केले होते. तर स्टार्कने आतापर्यंत १०२ गडी बाद केले आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ब्रेट ली अव्वल स्थानी आहे. ब्रेट लीने आतापर्यंत १६९ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडकीच्या खात्यात कधीही जमा होऊ शकतात ₹३०००; मार्च-एप्रिल हप्त्याबाबत अपडेट

High Cholesterol: ही ४ विचित्र लक्षणं दिसली तर समजा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचतंय घाण कोलेस्ट्रॉल

देशातील आणखी एक पक्ष फुटला; पाठिंब्यावरून पडले २ गट, राजकीय वर्तुळात खळबळ

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी घेतलेला निर्णय वाचून छाती अभिमानाने फुलेल, शिर्डीत साई दरबारी घोषणा

SCROLL FOR NEXT