PAKISTAN TWITTER
क्रीडा

AUS vs PAK: पाकिस्तानचा ऐतिहासीक विजय! ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करत रचला इतिहास

Australia vs Pakistan 3rd ODI: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना पार पडला.

Ankush Dhavre

Australia vs Pakistan 3rd ODI: पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला आहे. जे गेल्या २२ वर्षात कुठल्याही पाकिस्तानी कर्णधाराला जमलं नव्हतं, ते मोहम्मद रिझवानने करून दाखवलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवला. यासह मालिका २-१ ने खिशात घातली आहे.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचं आव्हान दिलं. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १४० धावांवर आटोपला. या धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने ८ गडी राखून सामना आपल्या नावावर केला.

पाकिस्तानसाठी हा ऐतिहासिक विजय आहे. कारण गेल्या २२ वर्षात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियात जाऊन वनडे मलिका जिंकता आली नव्हती. पाकिस्तानने कर्णधार आणि कोच बदलल्यानंतर हा कारनामा केला आहे. यापूर्वी बाबर आझम पाकिस्तानचा कर्णधार होता. मात्र आता ही जबाबदारी मोहम्मद रिझवानकडे सोपवण्यात आली आहे.

गोलंदाजांचा कहर

या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांचा कहर पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी दमदार गोलंदाजी केली. या डावात गोलंदाजी करताना दोघांनी ३-३ गडी बाद केले.

या गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा डाव १४० धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने २ फलंदाज गमावून शानदार विजय मिळवला. पाकिस्तानकडून अब्दूल्ला शफीक आणि सॅम आयुबने ८४ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. यासह शफीकने ५३ चेंडूत ३७ आणि मोहम्मद रिझवानने नाबाद ३० धावांची खेळी केली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अचानक वेगाने गेंडा आला रस्त्यावर, लोकांना पळता येईना, पुढे जे घडलं ते पाहा

'Bigg Boss' फेम अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव, वयाच्या १६व्या वर्षीच...

Calculator: कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात? कोणालाच माहित नाही

Diabetes Warning Signs: डायबेटीज रूग्णांना पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; संकेत समजून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT