Meg Lanning Takes Break From Cricket  SAAM TV
Sports

धक्कादायक निर्णय! कॉमनवेल्थ गेम्समध्ये जिंकलं गोल्ड मेडल; आता खेळच सोडला!

देशाला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या कर्णधारानंच अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Nandkumar Joshi

Meg Lanning Takes Break From Cricket मुंबई: टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेली महिला क्रिकेटपटू मेग लॅनिंग हिनं क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची कर्णधार मेग लॅनिंगनं ब्रेक घेतल्याचे जाहीर केले आहे. तिच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

मेग लॅनिंग (Meg Lanning) हिनं हा निर्णय घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिने या निर्णयाबाबत क्रिकेट (Cricket) ऑस्ट्रेलियाला (Australia) कळवले आहे. आता ती पुन्हा क्रिकेट संघात परत येणार का, याबाबत साशंकता आहे. क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेण्याचा तिचा निर्णय असून, नेमका किती कालावधी असेल याबाबत अनिश्चितता आहे.

ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मेग लॅनिंग हिच्या संघातील पुनरागमनाबाबतीत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही, असे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी क्रिकेटपासून दूर राहण्यामागचे कारण लॅनिंगने स्पष्ट केलेले नाही.

मेग लॅनिंग म्हणाली की, सलग दोन वर्षे बीझी शेड्युलनंतर आता थोडा वेळ स्वतःलाही द्यावा यासाठी हा मी निर्णय घेत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि संघ सहकाऱ्यांचे मी आभारी आहे, ज्यांनी मला समजून घेतलं.

मेग लॅनिंगने कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये (CWG 2022) सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद सांभाळले. तिच्या नेतृत्वाखाली संघाने फायनल जिंकून सुवर्णपदकही मिळवले. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले होते.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची हेड ऑफ परफॉर्मन्स शॉन फ्लेगर म्हणाली की, आम्हाला मेगचा अभिमान वाटतो. तिच्या निर्णयाचा आम्ही सर्व सन्मानच करतो. तिला क्रिकेटपासून थोडा ब्रेक हवा आहे. तिच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. ती गेल्या दशकभरापासून ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये आपलं योगदान देत आहे. या कालावधीत तिनं यशस्वी कामगिरी केली आहे. युवा क्रिकेटपटूंसाठी ती प्रेरणादायी ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT