पुदुचेरीत १९ वर्षीय क्रिकेटरचा मृत्यू
टी-२० संघात निवड न झाल्याने नैराश्य
क्रीडा क्षेत्रातील मानसिक ताणावर प्रश्न
प्रादेशिक टी-२० संघात निवड न झाल्याने एका महिला क्रिकेटरनं टोकाचा निर्णय घेत आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना पुदुचेरीमध्ये घडली आहे. अंतिम संघातून नाव वगळल्यामुळे ही तरुण खेळाडू पूर्णपणे खचली होती, असे वृत्त आहे. एंजल गंगवाणी (वय १९) असं महिला या क्रिकेटरचे नाव आहे. ती पुदुचेरी येथे क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होती. एंजलच्या वडिलांचे नाव काश्मीर कुमार आहे, ते चेन्नई येथे कार्यरत असलेल्या जीएसटी अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
एंजल गंगवाणी ही वेलरामपेट येथील एका खासगी महाविद्यालयात बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. एंजल गेल्या दोन वर्षांपासून सोक्कनाथनपेटमधील एका भाड्याच्या घरात राहत होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार एंजल थिलासपेट येथील एका प्रशिक्षण केंद्रात सराव करत होती. तिने नुकतेच थुतीपेट येथे झालेल्या पुदुचेरी टी२० क्रिकेट संघाच्या निवड चाचण्यांमध्ये भाग घेतला होता. आता संघ निवडीची अंतिम यादी जाहीर झाली तिने आत्महत्या केली आहे.
एंजलच्या घरमालकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार बुधवार रात्री ८ वाजता एंजल सराव सत्रानंतर घरी आली. तिच्या प्रशिक्षकाने तिच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु त्यांचे फोनवर नीट बोलणं झालं नाही. त्यानंतर तिचे प्रशिक्षक तिच्या घरी आले. त्यावेळी त्यांना ती छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. प्रशिक्षक आणि घरमालकाने तिला तात्काळ कथिरकामम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेले. मात्र तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
क्रिकेट हा एक उच्च-दबावाचा आणि प्रसिद्धी देणारा खेळ बनल्यामुळे, त्यातील खेळाडूंच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. महत्त्वाकांक्षी खेळाडूंना अनेकदा कामगिरीच्या प्रचंड अपेक्षा, सततची छाननी आणि अस्थिर कारकिर्दीच्या वाटचालीचा सामना करावा लागतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.