Asian Games 2026  
Sports

IND vs PAK : भारत-पाकिस्तानचा महामुकाबला ठरला, पण एकाच अटीवर भिडणार कट्टर प्रतिस्पर्धी, पाहा वेळापत्रक

Asian Games 2026 : जपानमध्ये होणाऱ्या आशियाई गेम्समधील क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये खेळणार आहेत.

Namdeo Kumbhar

Asian Games 2026 Cricket Schedule: आशियाई गेम्स २०२६ मधील क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. मात्र, हा हाय-व्होल्टेज महामुकाबला एकाच अटीवर शक्य होणार आहे. भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात उतरणार आहे. दरम्यान, भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी चीनमधील हांगझू येथे झालेल्या २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली आहेत. यंदा भारतीय संघ गतविजेते म्हणून या स्पर्धेत उतरणार आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही कट्ट्रर प्रतिस्पर्धी संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत (Quarter-finals) प्रवेश देण्यात आला आहे. जर दोन्ही संघांनी आपापले सामने जिंकले, तरच अंतिम फेरीत (Final) किंवा कांस्यपदकाच्या लढतीत भारत-पाकिस्तान हा सामना पाहायला मिळणार आहे. जपानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ पुन्हा एकदा सुवर्णपदकावर नाव कोरण्यासाठी मैदानात उतरेल.

पुरुष गटात एकूण १० आणि महिला गटात ८ संघ सहभागी होतील. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ थेट बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत, तर उर्वरित सहा संघ पहिल्या फेरीत खेळतील. अफगाणिस्तान, हाँगकाँग, मलेशिया, नेपाळ, जपान आणि ओमान हे संघ पहिल्या फेरीत खेळतील. त्यांची दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. २४ सप्टेंबरपासून पुरूष संघाचे सामने सुरू होतील.

भारत-पाकिस्तान सामना फक्त एकदाच

भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. पहिल्या फेरीच्या 'अ' गटामध्ये नेपाळ, जपान आणि अफगाणिस्तान आहेत. 'ब' गटामध्ये मलेशिया, ओमान आणि हाँगकाँग आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उर्वरित चार उपांत्यपूर्व फेऱ्यांमध्ये पोहोचतील. भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध फक्त एकदाच खेळू शकतील, एकतर उपांत्य फेरीत किंवा अंतिम सामन्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: “जीआर-एफआर काढण्यापेक्षा प्रति हेक्टरी किती मदत जाहीर करता?”; अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

LPG eKYC : LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! e-KYC केली नाही होणार आर्थिक नुकसान, जाणून घ्या नवा नियम

निवडणूक आयोगाचं तात्काळ स्पष्टीकरण, १० महिन्यांत त्या १४ तक्रारी; राजकारणातही उडाली खळबळ

Car battery life: कारची बॅटरी किती वर्ष चालते? जाणून घ्या कधी बदलावी?

Ragi Recipe: नाचणीची फक्त भाकरी नाही, तर 'या' 5 सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT