asian games 2023 schedule dates venues team india squad  Saam tv news
Sports

Asian Games 2023: एशियन गेम्ससाठी टीम इंडिया सज्ज! केव्हा, कधी अन् कुठे रंगणार सामने?

Asian Games 2023 Cricket Schedule: आशियाई क्रीडा स्पर्धेला लवकरच प्रारंभ होणार आहे.

Ankush Dhavre

Asian Games 2023 Schedule:

आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेचा थरार चीनमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरूष क्रिकेट संघ देखील खेळताना दिसून येणार आहे.

या स्पर्धेत भारतीय पुरूष क्रिकेट संघाची जबाबदारी रूतुराज गायकवाडच्या हाती असणार आहे. तर महिला संघाची जबाबदारी हरमनप्रीत कौरकडे असणार आहे. दरम्यान स्पर्धेतील सामने केव्हा आणि कुठे रंगणार आहेत जाणून घ्या.

केव्हा रंगणार आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार?

आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या सामन्यांना २८ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना ८ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. तर महिलांच्या क्रिकेट सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी रंगणार आहे.

भारतीय संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये..

या स्पर्धेतील सुरुवातीच्या टप्प्यात संघांची विभागणी ही ४ गटात करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेचा संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तर ग्रुप स्टेजबद्दल बोलायचं झालं तर ग्रुप ए मध्ये अफगाणिस्थान, मंगोलिया, ग्रुप बी मध्ये कंबोडिया, जपान आणि नेपाळचा संघ असणार आहे. तर ग्रुप सी मध्ये हाँगकाँग आणि थायलंड तर ग्रुप डी मध्ये बहरीन आणि मालदिवचा संघ असणार आहे.

मोबाईलवर कुठे पाहु शकता सामना?

आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर या स्पर्धेतील सामने Sony Liv अॅपवर लाईव्ह पाहता येणार आहे.

कुठे रंगणार आशिया क्रीडा स्पर्धेतील सामने ?

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सामने युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी पिंगफेट क्रिकेट फिल्डच्या मैदानावर रंगणार आहे. (Latest sports updates)

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी असा आहे भारतीय पुरुष क्रिकेट संघ

रुतुराज गायकवाड़ (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), आकाश दीप.

राखीव खेळाडू: यश ठाकुर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी असा आहे महिलांचा क्रिकेट संघ:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, देविका वैद्य, टिटस साधु, राजेश्वरी गायकवाड़, मिन्नू मणि, कनिका आहूजा, उमा छेत्री (विकेटकीपर), अनुषा बरेड्डी आणि पूजा वस्त्राकर.

राखीव खेळाडू: हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, साइका इशाक.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वर्सोवा- अंधेरी मेट्रोत तांत्रिक बिघाड,प्रवाशांची घाटकोपर स्टेशनवर गर्दी

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana: वेळेवर ₹१५०० मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी

Mumbai Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे प्रचंड हाल; पाहा VIDEO

Marathi-Hindi : आपल्या घरात कुत्राही वाघ, ठाकरे बंधूंची दाऊदसोबत तुलना, भाजप खासदाराने डिवचलं

SCROLL FOR NEXT