Indian cricket team twitter
Sports

Asian Games 2023: क्रिकेटमध्ये गोल्डन धमाका! महिला संघामागोमाग पुरुष संघाचीही 'सुवर्ण' कामगिरी

India vs Afghanistan Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी इतिहास घडवला आहे.

Ankush Dhavre

India vs Afghanistan Asian Games 2023:

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने इतिहास घडवला आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला.या सामन्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. दरम्यान रँकिंगमध्ये वरच्या क्रमांकावर असल्याने भारतीय संघाला सुवर्णपदक बहाल करण्यात आले आहे.

हांगझाऊच्या पिंगफेस स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने १८.२ षटकात ५ गडी बाद ११२ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पावसाचं आगमन झालं आणि सामनान थांबवावा लागला.

अफगाणिस्तान संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर,संघातील फलंदाजांना हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. सामन्यातील दुसऱ्याच षटकात अफगाणिस्तानला पहिला धक्का बसला. सलामीवीर फलंदाज जुबैद अकबरी अवघ्या ५ धावा करत माघारी परतला. (Latest sports updates)

तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अफगाणिस्तानला दुसरा धक्का बसला. संघातील अनुभवी फलंदाज अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. अफगाणिस्तानचा संघ या धक्क्यातून सावरणार इतक्यात जदरान अवघी १ धाव करत माघारी परतला.

भारतीय महिला,पुरूष क्रिकेट संघाला सुवर्णपदक..

क्रिकेटमध्ये भारतीय पुरूष आणि महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. आता भारतीय संघाने देखील रँकिंगच्या जोराव सुवर्णपदक पटकावलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT