आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेत भारतीय संघाची दमदार कामगिरी सुरू आहे. भारतीय खेळाडूंनी बुधवारी (४ सप्टेंबर) देखील दमदार सुरूवात केली आहे.
मिश्र तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाज ज्योती सुरेखा आणि मराठमोळ्या प्रवीण ओजसने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या विजयासह भारताची पदकांची संख्या ७१ वर जाऊन पोहोचली आहे. हे भारताकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीतील पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.
तिरदांजीत भारतीय संघाला सुवर्णपदक.
भारतीय तिरंदाज ज्योती सुरेखा आणि प्रवीण ओजसने मिश्र कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातील अंतिम फेरीत धडक दिली. या जोडीने दक्षिण कोरीयाच्या चैवोन सो आणि जाहून जूविरूद्ध खेळताना ४०-३९ ची आघाडी घेतली होती.
भारतीय खेळाडूंनी आघाडी घेतल्यानंतर दक्षिण कोरीयातील नेमबाजांनी देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या फेरीतही दक्षिण कोरीयातील तिरंदाज एक गुणाने मागे राहिले.
तिसऱ्या फेरीनंतर भारत आणि दक्षिण कोरीयाचे ११९-११९ गुण होते. शेवटच्या सेटमध्ये भारतीय तिरंदाजांनी बाजी मारली अन् थेट सुवर्णपदाकावर निशाणा साधला. (Latest sports updates)
आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी ७१ पदकांची कमाई केली आहे. ही भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी २०१८ मध्ये जकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ७० पदकांची कमाई केली होती. ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.