Avinash sable Saam tv news
Sports

Asian Games 2023: शेतकऱ्याच्या पोरानं मैदान मारलं! मराठमोळ्या अविनाश साबळेला ३००० मीटर स्टीपलचेजमध्ये सुवर्णपदक

Avinash Sable News: महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेज स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

Asian Games 2023, Avinash Sable Won Gold In Steeplechase:

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. अशातच महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेज स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. यासह आशियाई क्रीडा स्पर्धेतील स्टीपलचेज इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय धावपटू ठरला आहे.

आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेतील ॲथलेटीक्स इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.

आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेतील हे १२ वे सुवर्णपदक ठरले आहे. ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये हे भारताचे पहिलाच सुवर्णपदक ठरले आहे. या शर्यतीत अविनाश साबळेने इतर धावपटूंपासून ५० मीटर अंतर बनवून ठेवलं होतं. विनिंग लाईन क्रॉस केल्यानंतर अविनाश साबळे जल्लोष साजरा करताना दिसून आला. (Latest sports updates)

कॉमनवेल्थ स्पर्धेत पटकावलं रौप्यपदक..

कॉमनवेल्थ २०२२ स्पर्धेत अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेज स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं होतं. त्याने राष्ट्रीय विक्रम मोडत ८:१२:४८ सेकंदात शर्यत पूर्ण करत पदक पटकावलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT